मुंबई: छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात उमेदवारीवरून सुरू झालेल्या वादावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पडदा टाकला आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ या दोन नेत्यांच्या भांडणात मागील निवडणुकीत शिवसेनेच्या हातून निसटला. या मतदारसंघात एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले होते. चार वेळा खासदार राहिलेल्या खैरे यांचा या निवडणुकीत पराभव झाला. हा पराभव दानवे यांच्यामुळे झाल्याचा  आरोप खैरे यांनी केला आहे. त्याचवेळी या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी आपण गेली दहा वर्षे इच्छुक असल्याची इच्छा दानवे यांनी व्यक्त केली. यावेळी दानवे- खैरे हे दोन्ही मातब्बर नेते या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत.

हेही वाचा >>> काँग्रेस सोडताना एक वरिष्ठ नेता माझ्या आईकडे रडत आला”, राहुल गांधींनी सांगितला ‘तो’ प्रसंग; रोख नक्की कोणावर?

दानवे आपले शिष्य असल्याचेही खैरे यांनी जाहीर केले आहे, पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय आपला कोणी गुरू नाही असे दानवे यांनी सांगितले आहे.  विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांनी  शिंदे गटात प्रवेश केल्याने परिषदेतील ठाकरे गटाचे संख्याबळ कमी झाले आहे. त्यामुळे दानवे यांचे विरोधी पक्षनेते पद धोक्यात आले आहे.  दहा वर्षे प्रयत्न करूनही दानवे यांना लोकसभा उमेदवारी न मिळाल्यास ते नाराज होणार आहेत. यासाठी ठाकरे यांनी दुपारी दोन्ही नेत्यांना मातोश्रीवर बोलवून समजूत काढल्याचे समजते.

Story img Loader