मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्क परिसरातील जुन्या महापौर निवासस्थानी साकारत आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट उलगडणारे हे स्मारक पुढील आठ महिन्यांत साकारणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ‘हे स्मारक कोणत्या सरकारच्या काळात पूर्ण होणार, या श्रेयवादापेक्षा बाळासाहेबांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे’, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे भूमिपूजन २०२१ मध्ये झाल्यानंतर, पाच वर्षांत या स्मारकाची जमिनीखाली दोन मजली इमारत उभी करण्यात आली. दोन तळघरांच्या असलेल्या या भव्य स्मारकामध्ये सहा दालने असून, याव्यतिरिक्त तीन दालने ही जुन्या महापौर बंगल्यात तयार करण्यात आली आहेत. नऊ दालनांच्या या स्मारकात बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट उभा करण्यात येणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. बाळासाहेबांना आत्मचरित्र लिहायला सांगितले असता, ते आपण कपाटातला माणूस नाही तर मैदानातला माणूस असल्याचे सांगायचे. त्यामुळे त्यांनी आत्मचरित्र कधीच लिहिले नाही, असे उद्धव यांनी सांगितले.

हेही वाचा >>>राज्यातील रामसर स्थळांचे संरक्षण न्यायालयाच्या देखरेखीखाली, न्यायालयाकडून जनहित याचिका दाखल

स्मारकात बाळासाहेबांची भाषणे, व्यंगचित्रे, त्यांच्या जीवनावरील छायाचित्रे तसेच अन्य माध्यमांतून त्यांचा जीवनपट उलगडणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर २३ जानेवारी २०२६ पासून बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. ते सुरू होण्याआधी स्मारकाचे लोकार्पण करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी दिली.

विचार सोडणाऱ्यांना आमंत्रण नाही’

स्मारकाच्या उद्घाटनाचे आमंत्रण कोणाला देणार, असे उद्धव ठाकरे यांना विचारले असता, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना आमंत्रण देणार नाही, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला. हे स्मारक पूर्ण होण्याचे श्रेय २०२६मध्ये जे सरकार असेल, त्यांना देणार असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

बांधकाम करताना एकही झाड तोडण्यात आलेले नाही परिसरात २००हून अधिक झाडे तशीच ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे महापौर बंगल्याच्या सौंदर्याला कोणतीही बाधा येणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. आभा लांबा, वास्तुविशारद