“तुम्ही चिरकत रहा पण माझा वाडा चिरेबंद आहे. माझा वाडा चिरेबंद आहे.. टकरा मारा.. मुसंड्या मारा, डोकी फुटतील पण तडा नाही जाणार, अजिबात जाणार नाही.” असं म्हणत आज शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

मुंबईतील षणमुखानंद सभागृहात आयोजित शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपा व विरोधकांवर विविध मुद्द्य्यांवरून जोरादार टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “एक विकृती हल्ली आलेली आहे, आणि मला आता असं वाटायला लागलेलं आहे. की हे जे चिरकणं आहे. मग ठाकरे कुटुंबावर हल्ले… हल्ले म्हणजे आता कुणी असा मायेचा पूत जन्माला आलेला नाही, ठाकरे कुटंबावर हल्ला करणारा.. तिथल्या तिथे ठेचून टाकू. पण काही वाटेल ते बोलायचं कुटुंबीयांची बदनामी करायची. हे आता त्यांचं रोजगार हमीचं काम झालेलं आहे. काय करणार, करोनामध्ये सगळं बंद आहे. मग काय करायचं तू चिरकलास किती? एवढा चिरकलास मग हे त्याचे पैसे.. चिरकत रहा..तुम्ही चिरकत रहा पण माझा वाडा चिरेबंद आहे. माझा वाडा चिरेबंद आहे.. टकरा मारा.. मुसंड्या मारा, डोकी फुटतील पण तडा नाही जाणार. अजिबात जाणार नाही.”

“आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही, दाबणारा कधीच जन्माला येणार नाही”

विजयादशमी निमित्त दरवर्षी होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा, करोनाची साथ नियंत्रणात आल्याने यंदा ऑनलाइनऐवजी थेट घेण्यात आला. मात्र,उपस्थितीच्या मर्यादेमुळे नेहमीप्रमाणे शिवाजी पार्कऐवजी यंदाचा दसरा मेळावा हा षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

Story img Loader