अदाणी उद्योग समुहाकडून होत असलेल्या धारावीच्या पुर्नविकास प्रकल्पाविरोधात शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात शिवसैनिकांसह महाविकास आघाडी, अन्य संघटना आणि पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अप्रत्यक्षपणे खोचक टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरे म्हणाले, “धारावीकरांच्या घरांमध्ये कुणीतरी सुक्ष्म आणि लघू उद्योग मंत्री आहेच. पण, सुक्ष्म आणि लघू उद्योग धारावीकरांच्या घरा-घरात चालतात. जॅकेट, बूट आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारा धागाही धारावीत तयार होतो.”

हेही वाचा : VIDEO : “नशिब समजा तुमची स्थिती अजून…”, वर्षा गायकवाडांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

“धारावीतील अपात्र नागरिकांना मिठागरात पाठवणार आहेत”

“करोनाच्या काळात धारावीतील लोकांना पात्र-अपात्र ठरवलं नाही. मग, विकास करताना पात्र अपात्र ठरवणारे तुम्ही कोण? धारावीतील अपात्र नागरिकांना मिठागरात पाठवणार आहेत. अद्यापही मिठागराचा निर्णय झाला नाही. म्हणजे मिठागराची जागा सुद्धा ९९ वर्षांच्या करारावर अदाणींना देणार आहेत. आता ५० ते ५५ हजार लोक पात्र आहेत. तर, लाखांच्यावरती लोक अपात्र आहेत,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

हेही वाचा : “सरकार येतं आणि जातं, तुमचा रेकॉर्ड खराब करू नका”, धारावी मुद्द्यावरून ठाकरेंचं पोलिसांना आवाहन; म्हणाले, “गुंडागर्दी झाली तर…”

“आमचा विकासाला विरोध नाही”

“धारावीतील नागरिकांना मिठागरात पाठवून त्याचंही पुर्नविकास करण्याचासाठी अडाणींना देण्यात येईल. विकासाच्या नावाखाली सगळंच अदाणींच्या घशात घालण्याचं काम चालू आहे. धारावीकरांना ५०० फूटांचं घर मिळालं पाहिजे. आमचा विकासाला विरोध नाही. धारावीकरांना जिथल्या-तिथे घर मिळाले पाहिजेत. तसेच, रेल्वेलाईनमध्ये अदाणींनी त्याचं घर बांधावे. धारावीकरांचा घर बांधू नये,” असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावलं आहे.

“‘बीडीडी’चाळीप्रमाणेच धारावीचा विकास सरकारने करावा,” अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray taunt narayan rane over msme ministry dharavi march against adani group ssa