‘आयुष्यभर लोकांना गंडा घालत आलेल्या शरद पवारांना गंडा आणि बंधनाचा अर्थ काय कळणार,’ असा टोला उद्धव यांनी शरद पवारांना हाणला आहे.
‘गंडे’ बांधणे हा गुन्हा; शिवबंधनाला पवारांचा टोला
शिवसैनिकांना एकत्रित ठेवण्यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वाने कार्यकर्त्यांना गंडेदोरे बांधल्याचे वाचनात आले. नव्याने करण्यात आलेल्या जादूटोणा कायद्यानुसार हा गुन्हा आहे अशी माहिती मला देण्यात आली. आता सरकारच काय ते बघेल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी लगावला होता. त्याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना उद्धव यांनी पवार यांच्या टीकेचा समाचार घेत पलटवार केला.  ‘शिवबंधनावर शरद पवारांनी केलेल्या टीकेमुळे त्यांच्या मनातलं विष बाहेर आले आहे, असे ते म्हणाले. शिवबंधनाच्या धाग्यांना जादूटोणा म्हणणारे शरद पवार रक्षा बंधनालाही जादूटोणा म्हणणार आहेत का ते त्यांनी एकदा स्पष्ट करावे. त्यांना तसे वाटत असेल तर आम्ही तसला जादूटोणाविरोधी कदापि मानणार नाही. तो कायदा उखडून फेकून देऊ,’ असा संतापही उद्धव यांनी व्यक्त केला.

Story img Loader