मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस(सीएसटी) येथे उद्यान एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून खाली घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन सकाळच्या वेळी घडलेल्या या अपघातामुळे चाकरमान्यांना रेल्वे प्रवासाच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सीएसटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांत १७ वरून उद्यान एक्स्प्रेस मार्गस्थ होत असताना इंजिनाची दोन चाकं रुळावरून खाली घसरली. त्यामुळे मध्य रेल्वेच्या सीएसटी ते भायखळा दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरची जलदगती वाहतूक धीर्मा मार्गावर वळविण्यात आली. परिणामी, धीम्या मार्गावर अतिरिक्त ताण पडल्याने वाहतूक उशीराने सुरू आहे. लवकरच वाहतूक पूर्ववत होईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Udyan express derailed in cst station
Show comments