डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची फेसबुकच्या माध्यमातून बदनामी केल्याच्या निषेधार्थ उल्हासनगरमध्ये मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील सर्व बाजारपेठा, रिक्षा बंद ठेवण्यात आल्या होत्या. सर्व राजकीय पक्षांनी बंदमध्ये सहभाग दाखविला होता. मध्य प्रदेशातून मेश्राम नावाच्या व्यक्तीच्या फेसबुकवरील खात्यात बाबासाहेबांची बदनामी करणारी छायाचित्रे टाकण्यात आली होती. कल्याणमध्ये निषेधाचे फलक लावण्यात आले होते. या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी मंगळवारी सकाळी उल्हासनगर बंदची घोषणा केली. बंद शांततेत पाळण्यात आला.
बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ उल्हासनगर बंद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची फेसबुकच्या माध्यमातून बदनामी केल्याच्या निषेधार्थ उल्हासनगरमध्ये मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला.
First published on: 14-08-2013 at 02:09 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulhasnagar close for babasaheb ambedkar disgrace