उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये केनियामधून एक कुटुंब आले होते. त्यांनतर कुटुंबाची महापालिकेतर्फे आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यानंतर कुटुंबातील एका सदस्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. याबाबत त्यांना तत्काळ कळवण्यात आले होते. मात्र यानंतरही ते अमृतसर, जम्मू-काश्मीर व वैष्णव देवी या ठिकाणी फिरायला गेले होते. या कुटुंबाने घरात राहणे आणि शहरात थांबणे अनिवार्य असताना, हे कुटुंब घरात न थांबता सहलीसाठी गेले.
दरम्यान ३१ डिसेंबर रोजी उल्हासनगरला हे कुटुंब पुन्हा घरी आले. करोना आणि ओमायक्रॉन या रोगाच्या नियम अटींबाबत या कुटुंबाने हलगर्जीपणा आणि नियमांचे पालन न केल्याने उल्हासनगर पालिका प्रशाशासनाने नियमांच्या अटी शर्ती भंग केल्याबद्दल या कुटुंबातील प्रमुखाविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.