मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने इंधन खर्चात बचत करण्यासाठी, पर्यावरण संवर्धनासाठी बसगाड्यांच्या ताफ्यात ई-शिवनेरी दाखल केली. एसटी महामंडळाची प्रीमियम ब्रँड म्हणून शिवनेरी ओळखली जाते. मुंबई – पुणे दरम्यान ई – शिवनेरीचा स्वच्छ, प्रदूषण मुक्त, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास घडतो. मात्र, मुंबई – पुणे मार्गावर धावणाऱ्या ई- शिवनेरी बसमध्ये खासगी कंपनीच्या चालकांनी वाटेत अवैधरित्या प्रवासी बसून त्यांच्याकडून पैसे उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चालकाची चौकशी सुरू असून चौकशीअंती पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

स्वारगेट बस स्थानकातून नुकताच दादरला निघालेली ई-शिवनेरी बस खालापूर टोल नाक्यावर पोहोचली असता, संबंधित चालक अवैधरित्या १० ते १२ प्रवासी बसमध्ये चढवत असल्याची बाब बसमधील प्रवाशाच्या निदर्शनास आली. यावेळी संबंधित प्रवाशाने एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित घटनेची माहिती दिली. त्यानंतर वाशी टोल नाक्यावर बस पोहचली. एसटीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी तेथे बसमधील प्रवाशांची तपासणी केली. परंतु, अनधिकृत प्रवासी खालापूर टोल नाका – जुईनगर दरम्यान प्रवास करून बसमधून उतरून गेले. त्यामुळे हे प्रवासी बसमध्ये आढळले नाहीत. मात्र, बस चालकाची तपासणी केली असता, त्याच्याकडे कर्तव्यावर जात असताना नोंद केलेल्या रकमेपेक्षा ३ हजार रुपये जास्त आढळले. याबाबत संबंधित चालकाला स्पष्टीकरण देता आले नाही.

Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024 Live: विधानसभेच्या निकालानंतर राजकीय घडामोडी वाढणार; महाविकास आघाडीची उद्या तातडीची बैठक
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Maharashtra Assembly Election analysis by girish kuber
Video: “दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादीच्या आमदारांची २०१९ च्या तुलनेत बेरीज वाढली तर…”, वाचा, गिरीश कुबेर यांचे विश्लेषण
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Mumbai Exit polls
Mumbai Exit Polls Update : मुंबईत आवाज कुणाचा? महायुतीची गर्जना की मविआची डरकाळी? एक्झिट पोलचे अंदाज वाचा!
11 injured as bus falls into 20 feet deep pit on Mumbai Pune expressway accident case
मुंबई-पुणे दृतगती मार्गावर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली; ११ जण जखमी
Manoj Jarange patil Maratha
Maharashtra Exit Poll Updates : मनोज जरांगेंचा प्रभाव नाही? मराठा मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने? एक्झिट पोल्सचे अंदाज काय सांगतात?
Students killed in class due to dispute in school crime news
शाळेत झालेल्या वादातून वर्गात विद्यार्थ्यांचा गळा चिरला- नववीतील विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद

हेही वाचा – नव्या वर्षात कोकण मार्गावरील रेल्वेगाडीला एलएचबी डबे जोडणार

एसटीच्या अधिकाऱ्यांनी या बसतून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांकडे याबाबत विचारणा केली. त्यावेळी प्रवाशांनी या घटनेला दुजोरा दिला. संबंधित चालकाची सध्या चौकशी सुरू असून, असा प्रकार त्याने यापूर्वी केला आहे का याचा तपास सुरू आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली. दरम्यान मुंबई पुणे मार्गावरील ई – शिवनेरीतून अवैधरित्या टप्पा वाहतूक करून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे एसटीचा महसूल बुडत आहे. अशा अवैध प्रवाशांना अटकाव करण्यासाठी एसटीने कठोर पाऊले उचलावीत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा – डॉक्टरांच्या आंदोलनानंतर व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ, मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबतच्या चर्चेनंतर निघाला तोडगा

एसटी महामंडळाची खासगी चालकांकडून सातत्याने फसवणूक केली जात आहे. यामागे एसटी महामंडळाच्या काही अधिकाऱ्यांचा हात असल्याची शक्यता आहे. प्रवाशाने तक्रार केल्यानंतर तत्काळ सुरक्षा अधिकाऱ्यांचे पथक पोहोचणे अपेक्षित होते. तसेच संबंधित खासगी बस कंपनीवरही कारवाई करावी. – श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस</p>