मुंबई : महानगरपालिकेच्या पी उत्तर विभाग हद्दीतील मढ-मार्वे मार्गवरील एरंगल गावात बांधण्यात आलेल्या एक अनधिकृत इमारत शनिवारी जमीनदोस्त करण्यात आली. सुमारे २ हजार चौरस फुटाच्या क्षेत्रफळात उभारलेल्या तळ मजल्याच्या या इमारतीतवर पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.

संबंधित इमारतीचे नाव रूपवीर बंगलो असून त्याच्या तळ मजल्यावर अनधिकृतरित्या सहा खोल्या उभारण्यात आल्या होत्या. परिमंडळ ४ चे उप आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त कुंदन वळवी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. १ पोकलेन आणि २ जेसीबीच्या सहाय्याने १० कामगार, ४ पोलीस, ८ अभियंत्यांनी ही कामगिरी केली. तसेच या कारवाईत इमारत आणि कारखाना विभागाच्या कर्मचा-यांचाही सहभाग होता.