गेट वे ऑफ इंडियाच्या समोर एक नौका आढळल्याने खळबळ उडाली आहे. ताज महाल हॉटेलसमोरील समुद्रात एक नॉटिकल मैल अंतरावर ही नौका आढळून आली आहे. या नौकावर परदेशी झेंडा आढळून आला आहे. मात्र या नौकेमध्ये ‘क्रू मेंबर’ नव्हता.
निर्मनुष्य नौका सापडल्याच्या वृत्ताला पोर्ट झोनचे पोलीस उपायुक्त तानाजी घाडगे यांनी दुजोरा दिला आहे. याबाबत अधिक सांगता येणार नाही. पण आम्ही नौकेवर लक्ष ठेवून आहोत. सध्या आम्ही कुठलीही कारवाई केलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नौका नेमकी कुणाची आहे, ती परदेशी आहे का भारतीय आहे त्याची माहिती तपासात स्पष्ट होईल, असेही घाडगे यांनी सांगितले. २६/११ च्या हल्ल्यानंतर सागरी सुरक्षा कडक केलेली असूनही अशा प्रकारे नौका सापडल्याने सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले
आहेत.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा