मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अँटिलिया इमारतीबाहेर २५ फेब्रुवारीला स्फोटकं ठेवलेली गाडी आढळून आली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दहशतवादी कट असल्याचं तेव्हा सांगण्यात येत होतं. त्यानंतर ५ मार्चला ठाण्यातील उद्योगपती मनसुख हिरेन याचा संशायस्पद मृत्यू झाला. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आणि तपासाअंती अनेक खुलासे होत गेले. हा संपूर्ण कट सचिन वाझे याने रचल्याचं उघड झाल्याने त्याला अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ त्याला मदत करणाऱ्या रियाज काझी या पोलीस अधिकाऱ्याला देखील अटक करण्यात आली होती.

दरम्यान, एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) छापा टाकला आहे. त्यामुळे पुन्हा हे प्रकरण चर्चेत आले आहे. या सर्व प्रकरणांची सुरवात अँटिलिया प्रकरणापासून झाली. अँटिलियानंतर मनसुख हिरेन मृत्यू, सचिन वाझेला अटक आणि आता वाझेंचे गुरु प्रदीप शर्मा एनआयएच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळे अँटिलिया प्रकरण काय आहे?, नेमकं काय घडलं होतं, हे समजून घेऊया…

Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
yamuna revier
यमुनेच्या पाण्यावरून वादाचे तरंग; केजरीवाल यांच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Aditya Thackeray
“मुख्यमंत्री परदेशात असताना पालकमंत्रिपदांवर स्थगिती…”, आदित्य ठाकरेंना वेगळाच संशय; म्हणाले, “पहिल्यांदाच…”
Vijay Wadettiwar eknath shinde
“शिंदेंची गरज संपली, आता नवा उदय पुढे येणार”, वडेट्टीवारांचा मोठा दावा; म्हणाले, “दोन्ही बाजूला…”
Arvind Kejriwal Car Attacked
Arvind Kejriwal : Video : अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा ‘आप’चा दावा, तर भाजपानेही केला गंभीर आरोप
Standing Committee meeting approves fund for former Mahayuti corporators ward Pune news
महापालिका निवडणुकीची साखरपेरणी ! वर्गीकरणाचे १२ कोटी ६० लाख मंजूर, महायुतीला झुकते माप

घटनाक्रम! स्कॉर्पिओ, मनसुख हिरेन मृतदेह ते सचिन वाझेंना अटक

२५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अँटिलिया इमारतीबाहेर स्फोटकं ठेवलेली गाडी आढळून आली होती. त्यानंतर देशभर या प्रकरणाची चर्चा झाली. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला. त्यानंतर या तपासासाठी पोलीस आयुक्तांकडून सध्या अटकेत असलेले सहायक निरीक्षक सचिन वाझे यांची निवड करण्यात आली.

तपासात २७ फेब्रुवारीला ही स्कॉर्पिओ ठाण्यातील ऑटोमोबाइल व्यावसायिक मनसुख हिरेन यांची असल्याचे कळाले. मात्र ही कार १७ फेब्रुवारीला चोरी झाल्याची तक्रार विक्रोळी पोलीस ठाण्यात नोंद असल्याची माहिती उघड झाली. तरी देखील मनसुख हिरेन यांची २८ फेब्रुवारीला एनआयए, एटीएससह गुप्तचर यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली.

तपासावर प्रश्नचिंन्ह उपस्थित होऊ लागले. विरोधीनेते देखील सरकारवर टीका करत होते. त्यामुळे तपास पुढे सरकत नसल्याने सहायक आयुक्त नितीन अलकनुरे यांच्याकडे ३ मार्चला तपास सोपवण्यात आला. त्यानंतर ४ मार्चला तावडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला भेटण्यासाठी मनसुख हिरेन घोडबंदर येथे गेले. त्यानंतर ते बेपत्ता झाले.

हेही वाचा- अंबानी धमकी प्रकरण: NIA ने ज्यांच्या घरावर छापा टाकला ते प्रदीप शर्मा आहेत तरी कोण?

दुसऱ्या दिवशी ५ मार्चला मुंब्रा खाडीत रेती बंदर येथून मनसुख हिरेन यांचा मृतदेह हस्तगत करण्यात आला. त्यामुळे यामध्ये घातपात असल्याचा संशय कुटुंबाकडून व्यक्त करण्यात आला. कुटुंबानी देखील पोलिसांवर संशय घेतला होता. तसेच विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर तपासात सहभागी असलेले सचिन वाझे केंद्रस्थानी आले. त्यांच्यावर सतत टीका होऊ लागली.

६ मार्चला गृहविभागाने अंबानी धमकी प्रकरण, मनसुख यांच्या ताब्यातील कारची चोरी आणि मनसुख यांचा संशयास्पद मृत्यू या तिन्ही प्रकरणांचा तपास एटीएसकडे दिला. दुसऱ्या दिवशी ७ मार्चला मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनी केल्याचा मनसुख यांच्या कुटुंबियांचा संशय व्यक्त करणारा जबाब आला. त्यामुळे एटीएसकडून अनोळखी व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तपास एनआयएकडे

त्यानंतर ८ मार्चला अंबानी धमकी प्रकरणाचा तपास हाती घेण्याचे आदेश एनआयएला केंद्रीय गृहविभागाने दिले. दरम्यान, एटीएसने मनसुख हत्या प्रकरणात वाझे यांची आठ तास चौकशी केली होती. ते चौकशीत सहकार्य करत नसल्याची पोलिसांची तक्रार होती.  १२ मार्च रोजी ठाणे सत्र न्यायालयाने मनसुख हत्या प्रकरणात वाझे यांची अंतरिम अटकपूर्व जामीनाची मागणी फेटाळली. त्यानंतर १३ मार्चला एनआयएकडून  देखील वाझेची चौकशी करण्यात आली. एनआयएने रात्री १२च्या सुमारास वाझेला ताब्यात घेतले. अटक सचिन वाझे यांना भारतीय दंड संहितेतील २८६, ४६५, ४७३, ५०६(२), १२० ब आणि स्फोटक पदार्थ कायद्यातील ४(अ)(ब)(१) या कलमांन्वये अटक करण्यात आली.

Story img Loader