दाऊद इब्राहिमच्या नावाचा धाक दाखवून भाऊ इक्बाल कासकरने ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडून एक सदनिका खंडणी म्हणून उकळली होती. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नुकताच या मालमत्तेचा ताबा घेतला. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमने आपले संपूर्ण साम्राज्य याच धाकावर उभे केले. पण अधोविश्वात धाक असलेल्या दाऊदलाही एका प्रकरणात खंडणी द्यावी लागली होती, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. दाऊदकडून खंडणी घेणारा गुंड फजलू ऊर्फ फजल उल रहमान हा उद्योगपती गौदम अदानी यांच्या अपहरणाच्या गुन्ह्यात आरोपी आहे. मूळचा बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील रहिवासी असलेला फजलू सुरुवातीला जमील खानसाठी काम करीत होता. पण त्यानंतर त्याने बबलू श्रीवास्तव व इरफान गोगासाठी काम करण्यास सुरुवात केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इरफानला १९९५ मध्ये दुबईतून फजलूचा दूरध्वनी आला होता. त्यात ‘मी दाऊदचा मेहुणा हमीद अंतुले याला खंडणीसाठी दूरध्वनी करीत आहे. हैदराबादला जाऊन तुम्हीही हमीदला खंडणीसाठी दूरध्वनी करा,’ असे सांगितले. फजलूने हमीदला दूरध्वनी करून ५० लाखांची खंडणी मागितली. त्यामुळे घाबरलेल्या हमीदने दाऊदशी संपर्क साधला. त्यावेळी दाऊदने भाऊ अनीस इब्राहिमला फजलूला समज देण्यास सांगितले होते. अनीसने फजलूला दूरध्वनी करून हमीदकडे खंडणी न मागण्याबाबत बजावले होते. ‘तू माझा बॉस नाही, इरफान गोगा आहे’, असे फजलूने अनीसला फटकारले होते. त्यानंतर दाऊदला ५० लाख रुपये हमीदपर्यंत पोहोचवावे लागले. पुढे हमीदने ही रक्कम फजलूला दिली. धाक दाखवून खंडणी उकळणाऱ्या दाऊद टोळीला फजलूलाच खंडणी द्यावी लागली होती.

हेही वाचा : पालिकेचे भूखंड विकासकांना नकोसे, प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुनर्निविदा काढण्याची पालिकेवर नामुष्की, मलबार हिलचा भूखंड वगळणार

दाऊद हा अपमान सहन करू शकला नाही. त्याने शोएबमार्फत इरफान गोगाची हत्या घडवून आणली होती. गोगाची हत्या क्रूरतेने करण्यात आली होती. त्याच्यावर ५० गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गोगाच्या हत्येनंतर फजलूने १९९८ मध्ये दुबई गाठली. त्यावेळी उद्योगपती गौतम अदानी यांचे अपहरण करून १५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्या प्रकरणातही फजलूचा सहभाग उघड झाला होता. छोटा राजन व दाऊद यांच्यात १९९८ मध्ये टोळीयुद्ध सुरू होते. छोटा राजनवर २००० साली बँकॉकमध्ये हल्ला झाला. त्यातील प्रमुख सूत्रधार शरद शेट्टीची दुबईत हत्या झाली. त्यामुळे दुबई पोलिसांनीही टोळीयुद्ध रोखण्यासाठी कारवाईला सुरुवात केली. त्यामुळे फजलूने २००३ मध्ये दुबई सोडली आणि थायलंडला जाण्याचा निर्णय घेतला. पण तेथून तो नेपाळला गेला. तेथून भारतात आल्यावर त्याला अटक झाली. मुंबईसह देशभरात फजलूविरोधात ४० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात मुंबईतील मोक्काअंतर्गत दाखल गुन्ह्याचाही समावेश आहे.

हेही वाचा : महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे गटाची तयारी; ‘मातोश्री’वर पदाधिकाऱ्यांच्या बैठका, शाखानिहाय आढावा

फजलू अनेक वर्षांपासून तिहार तुरुंगात बंद आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने ६ ऑगस्ट २०१६ रोजी नेपाळ सीमेवरील गोरखपूरजवळ फजलूला अटक केली होती. सात वर्षे दुबई व दोन वर्षे थायलंडला राहून कोट्यवधींची खंडणी उकळल्याप्रकरणी फजलूविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Underworld don dawood ibrahim paid extortion of 50 lakhs to fazlu aka fazl ur rehman of irfan goga gang mumbai print news css