मुंबईः मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या शेजारी पडलेल्या गणवेशधारी पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. संबंधित पोलीस कॉम्बट वाहनावर कार्यरत होता. पण कर्तव्यावर उपस्थित राहण्याऐवजी तो दारू पिऊन रस्त्याच्या कडेला पडला होता. याबाबतचे आदेश उपायुक्त परिमंडळ-४ कडून जारी करण्यात आले.
निलंबित पोलीस काळाचौकी पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत होता. तेथील कॉम्बॅट वाहनावर त्याला तैनात करण्यात आले होते. त्याला ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता कामावर उपस्थित राहायचे होते. पण तो अनुपस्थित राहिला. त्यानंतर तो गणवेशात लालबाग येथील नारायण उद्योग भवन परिसरातील रस्त्याच्या शेजारी दाऊ पिऊन पडला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर उपायुक्तांनी याप्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर प्राथमिक चौकशीवरून त्यात सत्यता आढळल्यानंतर पोलिसाविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबतचे आदेश संबंधित पोलीस नाईकांना सुपूर्द करण्यात आले आहेत.
निलंबनाची कारवाई
याप्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर पोलिसाला बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. प्राथमिक तपासणीत तो कामावर अनुपस्थित होता. त्यानंतर तो मद्यधुंद अवस्थेत सापडल्याने त्याला निलंबित करण्याचे आदेश जारी करण्यात आले.