मुंबई : रुग्णांना उत्तम सुविधा मिळावी यासाठी गेल्या दोन महिन्यांमध्ये १०० हून अधिक वेळा मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांना भेट देणारे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना आता कर्मचाऱ्यांनी साकडे घातले आहे. रुग्णसेवेला प्राधान्य देण्याबरोबरच रुग्णालयातील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी कर्मचारी संघटनेने डॉ. शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> पीएमएवाय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेची स्थापना

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, रुग्णालयात स्वच्छता असावी, यासाठी डॉ. सुधाकर शिंदे रात्रीअपरात्री सर्व रुग्णालये, प्रसूतीगृह व आरोग्य केंद्रांना अचानक भेट देत आहेत. या पाहणीत दिसणाऱ्या समस्यांवर तातडीने आदेश देऊन आरोग्य खात्याची प्रतिमा उंचावण्याचे काम करत आहेत. मुंबई महानगरपालिकेची १९० सर्वसाधारण दवाखाने, १६ सर्वसाधारण रुग्णालये, ३० प्रसुतीगृहे, १७ अधिक सुतिका कक्ष, ५ विशेष रुग्णालये, २१२ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ५ वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये आहेत. तीन सुपर स्पेशालिटी रुग्णालयांचे काम सुरू असून, सर्व रुग्णालयांतील खाटांची संख्या १२ हजार ४६२ एवढी आहे. मात्र वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत खाटा अपुऱ्या पडत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत कामगारांच्या संख्येत वाढ झालेली नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पदेही भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. विविध संवर्गातील पदोन्नतीची पदे रिक्त आहेत. मात्र आरोग्य सेवेचा खोळंबा होऊ नये म्हणून अधिक मोबदला न घेता कर्मचारी काम करत आहेत. त्यांच्या समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या व मागण्या डॉ. सुधाकर शिंदे यांनी सोडवाव्या, अशी विनंती म्युनिसिपल मजदूर युनियनचे सह सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी पत्र पाठवून केली आहे.

हेही वाचा >>> मुंबईत गटारांवरील ४०० झाकणं गायब, भंगार विक्रेत्यांना पालिकेची तंबी

या आहेत मागण्या सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे, सातवा वेतन आयोग करार संपूर्ण भत्यासह लागू करणे, सामुदायिक वैद्यकीय गट विमा योजना लागू करणे, कंत्राटीकरण बंद करून कायम कामगारांची नेमणूक करणे, रुग्णालयांचे आधुनिकीकरण करताना सुरू होणाऱ्या विभागात लागणारे कर्मचारी, परिचारिका, तंत्रज्ञ, डॉक्टर यांची पदे भरणे, सेवा कालावधीमध्ये तीन स्तरीय आश्वासित प्रगती योजना (कालबद्ध पदोन्नती) पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे, कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे देय दावे तातडीने देणे, रोजंदारी व बहुउद्देशिय कामगारांना रिक्त पदावर सामावून घेणे.