भारतीय जनता पक्षाचे(भाजप) माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी काँग्रेस नेते मनिष तिवारी यांच्याविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेवर सुनावणी देताना मुंबई सत्र न्यायालयाने तिवारी यांना गडकरींना दहा हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईतील आदर्श सोसायटी या वादग्रस्त ठरलेल्या सोसायटीमध्ये गडकरींचाही बेनामी फ्लॅट असल्याचा आरोप मनिष तिवारी यांनी केला होता. या प्रकरणी नितीन गडकरींनी २०१० साली तिवारींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. यावर सुनावणी देताना न्यायालयाने तिवारींना दहा हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाल्याचा आदेश दिला. यानुसार मनिष तिवारी यांना गडकरींना दहा हजार रुपयांचा बाँड लिहून द्यावा लागणार आहे. 

Story img Loader