मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी रविवारी रात्री जाऊन अचानक जाऊन चर्चा केली. त्यामुळे राजकीय तर्कवितर्काना सुरूवात झाली आहे. नवी मुंबईतील जेएनपीटीचा कार्यक्रम आटोपून मुंबईतील निवासस्थानी परतताना गडकरी यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. आगामी मुंबई महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पूर्व नियोजित कार्यक्रम नसताना अचानक झालेल्या या भेटीने राजकीय चर्चाना सुरूवात झाली. ही सदिच्छा भेट खासगी स्वरूपाची होती, असे सूत्रांनी सांगितले.  याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. पण आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असून मनसेशी युती करणार नाही, असे भाजपने जाहीर केल्याने गडकरी-ठाकरे भेटीतून काही वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले.

Story img Loader