मुंबईतील सुप्रसिद्ध काला घोडा आर्ट फेस्टिव्हलमध्ये यंदा ‘कोरो इंडिया’ संस्थेने प्रथमच आर्ट इंस्टॉलेशनसह सहभाग घेतला. तसेच संवैधानिक मूल्यांचा प्रसार करणारे एक मांडणीशिल्प चर्चगेट स्टेशनजवळील क्रॉस मैदानात सादर केले. गुरुवारी (९ फेब्रुवारी) राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी या आर्ट इंस्टॉलेशनला आवर्जून भेट दिली. तसेच या उपक्रमाचं कौतुक केलं.

श्रीकांत देशपांडे म्हणाले, “काळा घोडा कलामहोत्सवात कोरो इंडियानं कलेच्या माध्यमातून संविधानाचा जागर करण्याचं अभिनव काम केलं आहे. त्यामुळे आज इथं या शिल्पाला भेट देताना मला विशेष आनंद झाला. इथं आज शाळेच्या मुलांनी संविधानाची प्रास्ताविका सगळ्यांना म्हणून दाखवली. कलेच्या माध्यमातून संविधानाचा प्रसार आणि पुनर्विचार इथे केला जात आहे.”

narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”
mukkampost bombilwadi mazi ladki janta yojna
मुक्कामपोस्ट बोंबिलवाडीची ‘लाडकी जनता योजना!’, पोस्ट होतेय व्हायरल, काय आहे ही योजना? वाचा…

“संविधानातील मूल्यं मानवता आणि आपल्या प्रगतीसाठी अत्यंत महत्वाची”

“संविधानामध्ये दिलेली मूल्यं मानवतेच्या दृष्टीने, आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत, या मूल्यांनुसार आपण वाटचाल केली तर देशाची प्रगती मोठ्या प्रमाणात होईल, हा संदेश या कलेच्या माध्यमातून कोरो इंडियानं दिला आहे.” अशा शब्दात श्रीकांत देशपांडे यांनी कोरो इंडियाच्या या अभिनव उपक्रमाचं कौतुक केलं. तसंच शुभेच्छाही दिल्या. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

काला घोडा आर्ट फेस्टिव्हलमधील मांडणीशिल्पात नेमकं काय?

भारतीय समाजाचं वैविध्य, विविध समूहांचं प्रतिनिधित्व दाखवणारं हे आर्ट इंस्टॉलेशन ‘कोरो इंडिया’ आणि आर्टिस्ट सुमीत पाटील यांच्या संकल्पनेतून तयार केलेलं असून ते संविधानिक मूल्यांचं महत्व अधोरेखित करणारं आणि त्यावरील विश्वास दृढ करणारं आहे. या मांडणीशिल्पाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून हे फेस्टिवलचं मुख्य आकर्षण ठरत आहे. कलेच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने संविधानिक मूल्यं लोकांपर्यंत पोहोचत आहेत. १३ फेब्रुवारीपर्यंत नागरिकांना हे मांडणीशिल्प पाहता येणार आहे.

“विविध कलाप्रदर्शनांपर्यंत ज्यांना कधी पोहोचता आलं नाही, त्या वातावरणाचा अनुभव घेता आला नाही, अशा तळातल्या कार्यकर्त्यांनी या आर्ट इंस्टॉलेशनसाठी जमेल ती वर्गणी दिली. हे मांडणीशिल्पाचं वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे तळातील आवाज कलेच्या माध्यमातून उमटू लागतो, तेव्हा बदलाचे पडसाद उमटतात. त्यामुळे जास्तीजास्त नागरिकांनी हे शिल्प पाहावे आणि येथील कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावा,” असं आवाहन कोरो इंडियानं केलं आहे.

कोरो इंडिया संस्थेचं काम काय?

कोरो इंडिया ही संस्था गेल्या ३३ वर्षांपासून सामाजिक समता, न्यायासाठी, संविधानिक मूल्यांसाठी तळागाळात काम करते. यावर्षी कलेच्या माध्यमातून संवैधानिक मूल्ये रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी कोरो इंडियाची टीम काला घोडा आर्ट फेस्टिवलमध्ये उपस्थित राहून लोकांशी संवाद करत आहे.

हेही वाचा : “संविधानाने कोणताच देव किंवा धर्म स्वीकारला नाही आणि…”, डॉ. विश्वंभर चौधरी यांचं नास्तिक परिषदेत वक्तव्य

फेस्टिवल सुरु झाल्यापासून या मांडणीशिल्पाजवळ विविध कलाकारांनी समतेची गाणी सादर केली. युवकांनी संविधानावर आधारित गीतावर समूहनृत्यही सादर केलं. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे विविध भाषांमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं. भारतीय संविधान, त्यातील मूल्यं सर्जनशीलपणे अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावीत, हा यामागचा उद्देश आहे. काला घोडा आर्ट फेस्टिवलमधील संविधानावर आधारित हे मांडणीशिल्प अनोखे असून सर्वांनी आवर्जून पाहावे, असं आवाहनही कोरो संस्थेनं केलं आहे.