Devendra Fadnavis Office in Mantralaya: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या मुलाखती व त्यातून त्यांनी मांडलेल्या राजकीय भूमिकांबाबत चर्चेत आहेत. मात्र,एकीकडे देवेंद्र फडणवीस क्लिष्ट अशा राजकीय मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडत असताना दुसरीकडे थेट मंत्रालयात त्यांच्याच कार्यालयाबाहेर एका महिलेचा असंतोष पाहायला मिळाला. एका अज्ञात महिलेनं मंत्रालयातील देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयात नासधूस करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला असून त्यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेबाबत चर्चा सुरू झाली आहे.

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला मंत्रालयाचा अभ्यागतांसाठी असणारा पास न काढताच आत गेल्याचं सांगितलं जात आहे. सचिव गेटमधून ही महिला मंत्रालयात गेल्याची प्राथमिक माहिती असून तिनं थेट फडणवीसांच्या कार्यालयाबाहेरच तिचा असंतोष अशा रीतीने प्रगट केल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. या महिलेचं काही काम प्रलंबित राहिल्यामुळे तिनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरील आपला संताप अशा रीतीने व्यक्त केल्याचं बोललं जात आहे.

Nana Patekar praised Ajit Pawar, Nana Patekar,
“अजित पवार त्यांच्या पद्धतीने खूप मोठे काम करत आहेत”, नाना पाटेकर यांनी केले कौतुक; राजकारणात न जाण्याचे सांगितले कारण
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
dcm ajit pawar warning pimpri chinchwad police over liquor sale prostitution in alandi
आळंदीतील मद्यविक्री, वेश्याव्यवसाय बंद न झाल्यास पोलिसांवर कारवाई; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा
Wardha, Narendra Modi, Nitesh Karale master,
वर्धा : सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींची अन् संतप्त मात्र कराळे गुरुजी! काय आहे कारण?
Girish Mahajan, High Court, Girish Mahajan news,
मंत्री गिरीश महाजनांवर उच्च न्यायालयाची नाराजी, काय आहे प्रकरण?
Ajit Pawar private secretary, Supriya Sule,
बारामतीत शासकीय कार्यक्रमात अजित पवारांंचा खासगी सचिव व्यासपीठावर?; राजशिष्टाचारात बदल केले का? सुप्रिया सुळेंचा सवाल
Mahendra Thorve, Mahendra Thorve security guard,
रायगड : आमदार थोरवेंच्या सुरक्षा रक्षकावर मारहाणीचा आरोप.. थोरवे यांच्याकडून आरोपांचे खंडन
Case against former Shiv Sena corporator Mohan Ugle in Kalyan
कल्याणमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यावर गुन्हा

Devendra Fadnavis: “…तर त्या दिवशी मी राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “हे सगळं राजकीय…”

फडणवीसांच्या कार्यालयाबाहेरची पाटी काढली!

दरम्यान, या महिलेनं मंत्रालयातील देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेरची पाटी काढून टाकली व तिथे घोषणाबाजी केली. तसेच, आरडाओरडा करत काही काळ फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर गोंधळही घातला. मात्र, त्यानंतर ती महिला मंत्रालयातून निघून गेली. त्यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

Dharmaveer 2 Release: “धर्मवीर ३’ ची पटकथा मी लिहिणार”, देवेंद्र फडणवीसांच्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!

पोलिसांकडून शोध सुरू

दरम्यान, सदर महिला नेमकी मंत्रालयात पास नसतानाही शिरली कशी? कोणत्याही सुरक्षा कर्मचारी वा अधिकाऱ्याने या महिलेला का हटकलं नाही? थेट देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर जाऊन या महिलेनं आपला राग का व्यक्त केला? तिचं कोणतं काम प्रलंबित होतं? सगळा प्रकार झाल्यानंतर ही महिला कुठे गेली? ही महिला नेमकी कोण होती? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात असून त्यासंदर्भात पोलीस सविस्तर तपास करत आहेत.