मालवणी येथील घटनेत एका नराधमाने आपल्या सात वर्षांच्या सावत्र मुलीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर आरोपी कोलकाता येथे फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
गुड्डू शेख (२५) असे या आरोपीचे नाव असून तो इस्टेट एजंट म्हणून काम करतो. गेल्या वर्षी त्याने एका बारबालेशी लग्न केले होते. या बारबालेला पहिल्या पतीपासून सात वर्षांची मुलगी होती. २८ आणि २९ जानेवारीला पत्नी कामानिमित्त बाहेरगावी गेली असताना शेखने मुलीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी वाच्यता न करण्याची धमकीही दिली. ३० जानेवारीला या मुलीची आई घरी आली असता तिने हा प्रकार सांगितला. तिच्या आईने पोलिसांच्या १०९ या हेल्पलाईनवर संपर्क करून पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी गुड्डू शेखविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
First published on: 04-02-2013 at 02:52 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unnatural sexual atrocity on step daughter