मुंबई : गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांसाठी मुंबई – कुडाळदरम्यान चार अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०११८१ अनारक्षित विशेष रेल्वेगाडी ७ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता सीएसएमटी येथून सुटेल आणि कुडाळ येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११८२ अनारक्षित विशेष रेल्वेगाडी ८ सप्टेंबर रोजी पहाटे ४.३० वाजता कुडाळ येथून सुटून त्याच दिवशी दुपारी ४.४० वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.
हेही वाचा – चार वैद्यकीय अभ्यासाक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
गाडी क्रमांक ०११०३ अनारक्षित विशेष गाडी ८ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता सीएसएमटी येथून सुटेल आणि कुडाळ येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११०४ अनारक्षित विशेष गाडी ९ सप्टेंबर रोजी पहाटे ४.३० वाजता कुडाळ येथून सुटेल आणि सीएसएमटी येथे त्याच दिवशी दुपारी ४.४० वाजता येथे पोहोचेल. या चार अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामठे, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली आणि सिंधुदुर्ग येथे थांबा देण्यात आला आहे.