अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आज (२९ ऑगस्ट) थेट मंत्रालयात आंदोलन केलं. धरणग्रस्तांना सरकारने नोकरी आणि मोबदल्याचं आश्वासन दिलं होतं, जे गेल्या ४५ वर्षांमध्ये कुठल्याच सरकारने पूर्ण केलं नाही असा आरोप करत धरणग्रस्त आज थेट मंत्रालयात घुसले. धरणग्रस्तांनी आणि शेतकऱ्यांनी मंत्रालयात सुरक्षेसाठी बसवलेल्या सुरक्षा जाळीवर उड्या मारून आंदोलन केलं. यावेळी ३० पेक्षा जास्त धरणग्रस्त सुरक्षा जाळीवर उतरले होते. त्यानंतर पोलिसांनी या आंदोलक शेतकऱ्यांची धरपकड केली. या धरणग्रस्तांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

अप्पर वर्धा धरणग्रस्तांच्या प्रश्नांबाबत राज्यातलं सरकार गंभीर नाही असा आरोप या धरणग्रस्तांनी केला आहे. आपल्या मागण्या मांडण्यासाठी हे धरणग्रस्त आज मंत्रालयावर धडकले, मंत्रालयातील दुसऱ्या मजल्यावर लावलेल्या सुरक्षा जाळीवर उतरले आणि त्यांनी आंदोलन केलं. अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी परिसरात सरकारने हे धरण बांधलं आहे. धरणग्रस्तांना सरकारने कोणतीही मदत दिली नाही असं सांगत धरणग्रस्त गेल्या १०५ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. मोर्शीच्या तहसील कार्यालयासमोर सलग १०५ दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. परंतु, अद्याप सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे आज सर्व धरणग्रस्तांनी मंत्रालयात आंदोलन केलं.

Campaigning of candidates taking advantage of Sunday holiday in Vasai Nalasopara vasai news
रविवार ठरला प्रचार वार; वसई, नालासोपाऱ्यात रविवारच्या सुट्टीची संधी साधत उमेदवारांचा जोरदार प्रचार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
navneet rana daryapur rada
VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!
Lakhat Ek Aamcha Dada fame nitish Chavan wishing post for Mahesh Jadhav
Video: “काजू आकाराने छोटा असला तरी त्याचा भाव…”, ‘लाखात एक…’ फेम नितीश चव्हाणने महेश जाधवला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा
Shocking viral video of a person broke his neck during a massage at a salon watch video
PHOTO: तुम्हीही सलूनमध्ये ‘फ्री हेड मसाज अन् मान मोडून घेताय? या तरुणाबरोबर जे घडलं ते पाहून पायाखालची जमीन सरकेल
hearing in bombay high court after two years in pmc bank scam
पीएमसी बँक घोटाळ्यात दोन वर्षांनंतर आज सुनावणी
Chirbil program of entertainment in Dombivli
डोंबिवलीकर किलबिल कार्यक्रमाची पोलिसांच्या १०० क्रमांकावर तक्रार

“आम्हाला गेल्या ४५ वर्षांपासून या सरकारने न्याय दिला नाही”. असं म्हणत या धरणग्रस्तांनी आज मंत्रालयात प्रवेश घेतला. त्यानंतर या धरणग्रस्तांनी सुरक्षा जाळीवर उड्या मारून आगळंवेगळं आंदोलन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही आज मंत्रालयात उपस्थित आहेत. अशा वेळी धरणग्रस्तांनी मंत्रालयात आंदोलन केलं. ३० हून अधिक धरणग्रस्त मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उतरले आणि त्यांनी घोषणा दिल्या.

हे ही वाचा >> “…तरी यांची घागर उताणीच राहणार”, दहिहंडीच्या आयोजनावरून ठाकरे गटाचा भाजपावर हल्लाबोल

मंत्रालयात कोणीही आत्महत्येचा प्रयत्न करू नये यासाठी काही वर्षांपूर्वी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर सुरक्षा जाळी बसवण्यात आली आहे. या सुरक्षा जाळीवर धरणग्रस्तांनी उड्या मारल्या.

१९७२ साली या धरणासाठी सरकारने स्थानिकांच्या जमिनी घेतल्या. धरण बांधण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात जमीन अधिग्रहित केली. परंतु, आम्हाला त्याचा मोबदला मिळाला नाही, असं धरणग्रस्तांचं म्हणणं आहे. तसेच सरकारने आम्हाला नोकरी देऊ असं सांगितलं होतं, परंतु, आम्हाला नोकऱ्या मिळाल्या नाहीत असं एका धरणग्रस्ताने आंदोलनावेळी टीव्ही ९ मराठीला सांगितलं.