२०१३च्या परीक्षेची सूचना न निघाल्याने उमेदवार हवालदिल
आयएएस, आयपीएस, आयएफएस आदी अधिकारी पदांसाठी ‘केंद्रीय लोक सेवा आयोगा’ने ऑक्टोबर, २०१२मध्ये घेतलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला तरी २०१३च्या परीक्षेची सूचना न निघाल्याने देशभरातील लाखो उमेदवार हवालदिल झाले आहेत.
२०१२च्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी सायंकाळी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. या परीक्षेतून देशभरातील सुमारे २,७०० उमेदवारांची मुलाखतीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी निवड करण्यात आली
आहे. उमेदवारांना आयोगाच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता
येईल.
भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि तत्सम केंद्रीय सेवा पदांसाठी (गट अ आणि ब) ही परीक्षा घेण्यात आली होती.
४ मार्चनंतर या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी उमेदवारांनी संबंधित कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. मुलाखतीसाठी तारीख आणि वेळ आयोगाच्या ँ३३स्र्://६६६.४स्र्२ू.ॠ५.्रल्ल. या संकेतस्थळावर पाहता येईल.
दरम्यान, २०१२च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला तरी आयोगाने २०१३च्या परीक्षेची सूचना काढलेली नाही. परिणामी यूपीएससी परीक्षा देण्यासाठी इच्छुक असलेल्या देशभरातील लाखो उमेदवारांच्या अपेक्षांवर पाणी पडले आहे.
२ फेब्रुवारी, २०१३ला या परीक्षेसाठी अधिसूचना आयोगातर्फे काढण्यात येणार होती. मात्र, याच दिवशी अधिसूचनेची तारीख अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे, असे आयोगाने एका तीन ओळींच्या पत्राद्वारे स्पष्ट केले. त्यामुळे, परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

Story img Loader