एकीकडे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं. सावित्रीबाई फुले यांचं नाव घ्यायचं आण या महाराष्ट्रात आपण उर्फी जावेदचा नंगानाच कसा सहन करतो आहे? आत्ताच्या आमच्या भगिनी स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतात. या सावित्रीच्या लेकींना उर्फीचा नंगा नाच मान्य आहे का? असाही प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे चित्रा वाघ यांनी?


सार्वजनिक ठिकाणी आम्हाला नंगा नाच मुळीच मान्य नाही. स्वातंत्र्याच्या नावावर सुरू असलेला स्वैराचार आम्ही खपवून घेणार नाही. माझं भांडण हे त्या बाईशी नाही. तिच्या विकृतीशी आहे. हे मी पहिल्या दिवसापासून सांगते आहे. मी जो काही विषय हाती घेतला आहे तो समाज स्वास्थ्याचा विषय आहे. हा नंगानाच आम्ही चालू देणार नाही. चार भिंतीच्या आत तुम्हाला काय करायचं ते करा. सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर तुम्ही नंगा नाच घालणार असाल तर ते आम्हाला चालणार नाही आम्ही ते चालू देणार नाही असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाल्या चित्रा वाघ?

उर्फीच्या विरोधात जी मी भूमिका काल घेतली होती तीच आजही आहे उद्याही असणार आहे. मी माझ्या घरासाठी या गोष्टी करत नाही. आज मुंबईच्या रस्त्यावर ती उर्फी नंगा नाच घालते आहे उद्या ती बीडच्या किंवा इतर कुठल्या शहरात घालू शकते. हे आपण खपवून घेणार आहोत का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हा नंगानाच आम्ही खपवून घेणार नाही म्हणजे नाही. यात कुठलंही राजकारण नाही. तरीही मला नोटीस पाठवली गेली. मी त्याचं ही उत्तर दिलं आहे. समाज स्वास्थ्याचा विषय घेऊन कुणी लढत असेल तर तिला घेरण्यासाठी जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे.

आणखी वाचा – चित्रा वाघ यांच्याशी वादानंतर दोन दिवस शांत असलेल्या उर्फीची नवी पोस्ट, बोल्ड फोटो शेअर करत म्हणाली…

मला काहीही फरक पडत नाही

किती लोक माझ्या विरोधात बोलतात? काय बोलतात? मला त्याच्याशी काहीही घेणंदेणं नाही. मी समाजातलं स्वास्थ बिघडू नये म्हणून काम करते आहे. मला महिला आयोगाचं अध्यक्षपद हवंय म्हणून मी हे बोलते आहे असं कुणाला वाटत असेल तर दुर्दैवी. प्रत्येक भाषणात तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता आपल्याला आपण सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतो. या सावित्रीच्या लेकींना नंगा नाच मान्य आहे का? मी जे काही बोलते आहे जी मागणी करते आहे त्यात चूक काय आहे? ते राजकारणाकडे का नेत आहात?

फॅशन कुणी करत नाही का?

फॅशन कुणी करत नाही का? पण फॅशन करणाऱ्या मुली कुणाला चेकाळवत फिरत नाहीत. मला ज्या भगिनी किंवा ज्या कुणी नेत्या विरोध करत आहेत त्यांना हा नंगा नाच मान्य आहे का? मला आश्चर्य याचं वाटतं की यावर चित्रा वाघ बोलत नाही, त्यावर चित्रा वाघ बोलत नाही हे म्हणतात मग तुम्ही का बोलत नाही? आपण समाज स्वास्थ्यासाठी काम करत असताना एखादी गोष्ट समोर आली तर त्यावर बोलणं म्हणजे मला पद हवंय म्हणून बोलते आहे हे म्हणणाऱ्यांच्या बुद्धिची किव मला येते असंही चित्रा वाघ म्हणाल्या. महाराष्ट्रातल्या एका आईने मला ही क्लिप पाठवलेली आहे. त्यामुळे मी या विषयावर बोलते आहे. त्या आईने मला जे काही पाठवलं तेव्हा मला कळलं ही बाई कोण आहे नाहीतर माझा काय संबंध उर्फी जावेदशी? माझ्या विरोधात बोलणाऱ्यांना थोड्या लाजा वाटल्या पाहिजेत.

आणखी वाचा – उर्फी जावेदचं ‘ते’ कृत्य पाहून तुमचाही होईल संताप, विमानतळावरच केलं असं काही की…

मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही

जे माझ्या विरोधात बोलत आहेत, व्यक्तिस्वातंत्र्य म्हणून एखादी बाई अंगावर कपडेच घालत नाही हे कसं चालेल? एखादी बाई तुकडे घालून रस्त्यावर फिरते आहे हे तुम्हाला मान्य आहे का? माझा विरोध उर्फी या व्यक्तीला नाही तिच्या विकृतीला आहे. मला विरोध करायचा असेल त्यांनी खुशाल करा. राजकीय मुद्द्यांसाठी माझ्यावर शंभरवेळा विरोध करा. मात्र उर्फीचा विषय राजकारणाचा नाही तरीही मला घेरलं जातं आहे. मला विरोध करणाऱ्यांना काय वाटलं की मी घाबरणारी आहे का? मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. हा नंगा नाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urfi should get dressed well first and go to the womens commission chitra wagh slams her again scj
Show comments