शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ज्या ठिकाणी अंत्यस्कार करण्यात आले ती जागा रिकामी करण्यासाठी मुंबई महापालिकेने खासदार संजय राऊत आणि मुंबईचे प्रथम नागरिक सुनिल प्रभूंना यांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, या दोघांच्याही कार्यालयातर्फे आपल्याला अशी कोणतीच मिळाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. दोन दिवसांनी म्हणजेच ६ डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असून त्यानिमित्ताने देशभरातून हजारो बौध्द अनुयायी दादर परिसरातील चैत्यभूमीवर येत असतात. त्यांच्या राहण्य़ाची सोय शिवाजी पार्कवर करण्यात येत असते. त्यामुळे या ठिकाणी कुठलाही अपप्रकार घडू नये म्हणून ही खबरदारी घेतली जात आहे, असं मुंबई महापालिकेतर्फे सांगण्यात आलं आहे. उध्दव ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौ-यावर असून ते याबाबत काय वक्तव्य करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवाजी पार्कवरील जागा रिकामी करण्य़ासाठी संजय राऊत, सुनिल प्रभूंना नोटीस
शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ज्या ठिकाणी अंत्यस्कार करण्यात आले ती जागा रिकामी करण्यासाठी मुंबई महापालिकेने खासदार संजय राऊत आणि मुंबईचे प्रथम नागरिक सुनिल प्रभूंना यांना नोटीस बजावली आहे.
First published on: 04-12-2012 at 11:22 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vacate the shivaji park place bmc notice to sanjay raut sunil prabhu