|| संदीप आचार्य
लाखो आरोग्यसेवक  दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत

मुंबई : महाराष्ट्रातील करोना रुग्ण व मृत्यूची संख्या लक्षात घेता केंद्राकडून मोठ्या प्रमाणात राज्याला लस पुरवठा होणे अपेक्षित असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्याला सापत्न वागणूक मिळत आहे. याचा परिणाम महाराष्ट्राच्या लसीकरणावर होत असून जवळपास तीन लाखाहून अधिक आरोग्य कर्मचारी व १० लाखाहून जास्त आघाडीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना अजूनही करोना लसीचा दुसरा डोस मिळू शकलेला नाही.

Girl dies in leopard attack in sambhaji nagar
छत्रपती संभाजीनगर : बिबट्याच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना
Rabi onion cultivation will increase by lakh hectares Mumbai
रब्बी कांदा लागवड लाख हेक्टरने वाढणार; जाणून घ्या, देशभरातील रब्बी लागवडीचा अंदाज
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?
Commodification of beauty
स्त्री ‘वि’श्व : सौंदर्याचं वस्तूकरण
Take SH 24 vaccine to protect against influenza Directives of Union Health Ministry
वाढत्या इन्फ्लूएन्झापासून बचावासाठी ‘एसएच २४’ लस घ्या! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश
In last 20 days 73 611 new voters registered in thane district ahead of assembly elections
जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत वाढ, २० दिवसांत ७३ हजार मतदारांची भर

राज्यात तीन ऑगस्ट रोजी ३ कोटी ३६ लाख ५१ हजार ३०५ लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे तर फक्त १ कोटी १३ लाख ५४ हजार ६२४ लोकांना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे. याचच अर्थ पहिला डोस मिळालेले दोन कोटींहून जास्त लोक लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.

२ जुलै रोजी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून दीड कोटी जादा लसींचे डोस देण्याची मागणी केली होती. मात्र ऑगस्ट महिन्यासाठी केंद्राकडून केवळ एक कोटी २० लाख लस डोस मिळणार आहेत.   चार हजाराहून अधिक लसीकरण केंद्रांची आमची तयारी असताना ३१ जुलै रोजी ३२०१ लसीकरण सत्राच्या माध्यमातून ५,७३,६८९ लोकांचे लसीकरण करण्यात आले. १ ऑगस्ट रोजी लस साठा खूपच कमी आल्याने ५८९ लसीकरण सत्राच्या माध्यमातून ८३,७१७ लोकांचे लसीकरण करण्यात आले. २ ऑगस्ट रोजी २,३८८ सत्राच्या माध्यमातून ३,२३,४५२ लसीकरण झाले तर ३ ऑगस्ट रोजी  २,२३,८२४ लोकांचे राज्यात लसीकरण करण्यात आले.

जवळपास चौदा लाखाहून अधिक आरोग्य सेवक व आघाडीच्या कर्मचारी करोना लसीच्या दुसरा डोस मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. १८ ते ४४ वयोगटातील पहिला डोस घेतलेल्यांची संख्या १ कोटी २० लाख आहे तर दुसरा डोस मिळालेल्यांची संख्या केवळ ७ लाख १३ हजार ३७६ एवढी आहे.

४५ वयोगटावरील एक कोटी ८२ लाख ३३ हजार ४६५ लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला तर या वयोगटातील ८५ लाख २३ हजार ११२ लोकांना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे. करोनाचे नवनवे उपप्रकार लक्षात घेता  किमान ७० टक्के लोकांचे लसीकरणाचे दोन्ही डोस लवकर होणे गरजेचे असल्याचे राज्याचे माजी आरोग्य महासंचालक व प्रमुख करोना विषयक सल्लागार डॉ सुभाष साळुंखे यांनी सांगितले.