|| संदीप आचार्य
लाखो आरोग्यसेवक दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : महाराष्ट्रातील करोना रुग्ण व मृत्यूची संख्या लक्षात घेता केंद्राकडून मोठ्या प्रमाणात राज्याला लस पुरवठा होणे अपेक्षित असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्याला सापत्न वागणूक मिळत आहे. याचा परिणाम महाराष्ट्राच्या लसीकरणावर होत असून जवळपास तीन लाखाहून अधिक आरोग्य कर्मचारी व १० लाखाहून जास्त आघाडीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना अजूनही करोना लसीचा दुसरा डोस मिळू शकलेला नाही.
राज्यात तीन ऑगस्ट रोजी ३ कोटी ३६ लाख ५१ हजार ३०५ लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे तर फक्त १ कोटी १३ लाख ५४ हजार ६२४ लोकांना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे. याचच अर्थ पहिला डोस मिळालेले दोन कोटींहून जास्त लोक लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.
२ जुलै रोजी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून दीड कोटी जादा लसींचे डोस देण्याची मागणी केली होती. मात्र ऑगस्ट महिन्यासाठी केंद्राकडून केवळ एक कोटी २० लाख लस डोस मिळणार आहेत. चार हजाराहून अधिक लसीकरण केंद्रांची आमची तयारी असताना ३१ जुलै रोजी ३२०१ लसीकरण सत्राच्या माध्यमातून ५,७३,६८९ लोकांचे लसीकरण करण्यात आले. १ ऑगस्ट रोजी लस साठा खूपच कमी आल्याने ५८९ लसीकरण सत्राच्या माध्यमातून ८३,७१७ लोकांचे लसीकरण करण्यात आले. २ ऑगस्ट रोजी २,३८८ सत्राच्या माध्यमातून ३,२३,४५२ लसीकरण झाले तर ३ ऑगस्ट रोजी २,२३,८२४ लोकांचे राज्यात लसीकरण करण्यात आले.
जवळपास चौदा लाखाहून अधिक आरोग्य सेवक व आघाडीच्या कर्मचारी करोना लसीच्या दुसरा डोस मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. १८ ते ४४ वयोगटातील पहिला डोस घेतलेल्यांची संख्या १ कोटी २० लाख आहे तर दुसरा डोस मिळालेल्यांची संख्या केवळ ७ लाख १३ हजार ३७६ एवढी आहे.
४५ वयोगटावरील एक कोटी ८२ लाख ३३ हजार ४६५ लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला तर या वयोगटातील ८५ लाख २३ हजार ११२ लोकांना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे. करोनाचे नवनवे उपप्रकार लक्षात घेता किमान ७० टक्के लोकांचे लसीकरणाचे दोन्ही डोस लवकर होणे गरजेचे असल्याचे राज्याचे माजी आरोग्य महासंचालक व प्रमुख करोना विषयक सल्लागार डॉ सुभाष साळुंखे यांनी सांगितले.