|| शैलजा तिवले
मुंबई : लशींचा अनियमित आणि असमान पुरवठा आणि शहरांपुरते मर्यादित असलेले खासगी लसीकरण यामुळे मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये १८ ते ४४ वयोगटातील सर्वाधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. तर ९ हून अधिक जिल्ह्यांमध्ये या वयोगटातील लसीकरणाचे प्रमाण अत्यल्प आहे.
राज्यात १८ ते ४४ वयोगटातील २६ टक्के नागरिकांना लशीची पहिली मात्रा तर केवळ २.१९ टक्के नागरिकांना दुसरी मात्रा मिळाली आहे. केंद्राने सर्वांसाठी मोफत लसीकरण सुरू केले असले तरी आवश्यकतेप्रमाणात साठा उपलब्ध होत नसल्यामुळे राज्यातील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. राज्यात सध्या संसर्ग वाढत असलेल्या जिल्ह्यांमध्ये, ग्रामीण भागांत लसीचा तुडवडा असल्यामुळे अद्यापही लसीकरणाचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. यात कोल्हापूर, सोलापूर, पालघर, उस्मानाबाद, नंदुरबार, नांदेड, जळगाव, बीड, आणि अदमदनगर जिल्ह्यांचा समावेश आहे.
कुठे किती लसीकरण
१८ ते ४४ वयोगटात सर्वाधिक सुमारे ६० टक्के नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे, पुण्यात हे प्रमाण ५६ टक्के आहे. या खालोखाल भंडारा, नागपूर, गोंदियामध्ये ३४ टक्के आणि ठाण्यात २९ टक्के झाले आहे. कोल्हापूरमध्ये १८ ते ४४ वयोगटातील केवळ ८ टक्के नागरिकांना पहिली मात्रा मिळाली आहे. रुग्णसंख्या वाढत असलेल्या सोलापूरमध्ये ११ टक्के तर अहमदनगरमध्ये १४ टक्के नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे. राज्यात रुग्णसंख्या सर्वाधिक असलेल्या साताºयात २० टक्के नागरिकांना पहिली मात्रा मिळाली आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्य हे प्रमाण अनुक्रमे १८ आणि २१ टक्के आहे.
लस कमी का?
१८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण मे महिन्यापासून सुरू झाले. त्यावेळी खासगी रुग्णालये आणि राज्यांना लस खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली. त्याचा फटका केंद्र सरकारला मिळणाºया लससाठ्यावरही झाला, तसेच केंद्राकडून राज्यांना मिळणाºया पुरवठ्यावरही. महाराष्ट्राने २५ लाख १० हजार ७३० लससाठा खरेदी केला. त्याचवेळी ४५ वर्षांवरील अनेक जण दुसºया मात्रेच्या प्रतीक्षेत असल्यामुळे १८ वर्षांवरील लसीकरण स्थगित करण्याची राज्यावर वेळ आली. मुंबईत आत्तापर्यंत १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणापैकी ६५ टक्के लसीकरण खासगी रुग्णालयात झाले आहे.
लशींच्या वितरणात असमानता आहे. कृतिदलाच्या माध्यमातून आम्ही सातत्याने लसीकरणाचे प्रमाण वाढण्यावर भर देत आहोत. ग्रामीण भागात खासगी रुग्णालयांना लस खरेदी करणे परवडणारे नाही, त्यामुळे येथे सरकारी केंद्राकडून मिळणाºया साठ्यावरच नागरिक अवलंबून आहेत. ग्रामीण भागात लससाक्षरता वाढवणेही आवश्यक आहे. – डॉ. राहुल पंडित, कृतिदलाचे प्रमुख
रुग्णसंख्या अधिक असलेल्या राज्यांना प्राधान्याने लस द्यावी, अशी मागणी आम्ही सुरुवातीपासून करूनही केंद्राने याची अंमलबजावणी केलेली नाही. राज्यातही केंद्राच्याच नियमावलीने लसवाटप केले जाते. त्यामुळे काही जिल्ह्यांना लससाठा पुरेसा मिळत नसल्यामुळे लसीकरण वेगाने होऊ शकलेले नाही. – डॉ. सुभाष साळुंखे, राज्याचे करोना सल्लागार