मुंबई : शहरात शनिवारी दहा लसीकरण केंद्रांवर ३० ते ४४ वयोगटातील १७७८ जणांना कोव्हिशिल्डची पहिली मात्रा दिली गेली. सोमवारी या वयोगटासाठी पूर्वनोंदणीशिवाय लसीकरणाची सुविधाही सुरू असणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी होऊन रांगा लागण्याची शक्यता आहे.

मुंबईत शनिवारी ३० ते ४४ वयोगटाचे लसीकरण दहा केंद्रांवर पूर्वनोंदणी करून वेळ आरक्षित केलेल्यांसाठीच खुले केले होते. पूर्वनोंदणी आणि वेळ आरक्षित करूनच नागरिक आले होते. त्यामुळे गर्दी होणे किंवा गोंधळ होणे असे प्रकार शनिवारी घडले नाहीत.

मुंबईतील पालिकेच्या केंद्रावर सोमवार ते बुधवार ४५ वर्षांवरील नागरिकांचे पूर्वनोंदणीशिवाय आणि गुरुवार ते शनिवार पूर्वनोंदणी करूनच लसीकरण केले जाते. यात आता ३० ते ४४ वयोगटाचाही समावेश केलेला आहे. त्यामुळे २१ जून रोजी या वयोगटालाही पूर्वनोंदणी न करता लसीकरण करता येणार आहे.

Story img Loader