मुंबई: भारतीय रेल्वेचे जाळे वंदे भारत एक्सप्रेसने जोडण्याचा मानस असून त्यादृष्टीने भारतीय रेल्वे पावले टाकत आहे. देशाची आर्थिक राजधानी देशासह राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणांना जोडण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई – जालन्यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वेवरून मुंबई – सोलापूर, मुंबई – शिर्डी, मुंबई – मडगाव आणि पश्चिम रेल्वेवरून मुंबई – गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. आता नव्याने मुंबई – जालना वंदे भारत चालवण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी मुंबई – जालना दरम्यान पायाभूत सुविधांवर भर दिली जात आहे. जालना – मनमाड या १७४ किमी मार्गावर रेल्वेची गती ताशी १३० किमीपर्यंत वाढवण्यास मार्च २०२३ मध्ये मान्यता मिळाली आहे. तसेच या मार्गातील विदयुतीकरण, सिग्नल यंत्रणा, रेल्वे मार्गाचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आकर्षक आणि वेगवान अशी वैशिष्ट्ये असलेली वंदे भारत या मार्गावर चालवण्यास सक्षम आहे. त्यामुळे वर्षाखेरीस मुंबई – जालना वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविण्यात येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… दुरावस्थेत असलेले आरे रुग्णालय अखेर सुरू होणार; वैद्यकीय संस्थेची निवड; प्रस्ताव दुग्धविकास विभागाला सादर

दरम्यान, ही वंदे भारत १६ डब्यांची असण्याची शक्यता आहे. तसेच वंदे भारत एक्सप्रेस जालन्याहून पहाटे ५.३० वाजता सुटण्याचे नियोजन केले जात आहे. मात्र रेल्वे मंडळाने यासंदर्भातील कोणतेही वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vande bharat express will be started between mumbai jalanya by the end of the year mumbai print news dvr
Show comments