मुंबई : मुंबई-गोवा रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या उद्देशाने मध्य आणि कोकण रेल्वेवरून मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसची मंगळवारी चाचणी घेण्यास सुरुवात केली. या चाचणीत सीएसएमटी ते मडगाव अंतर वंदे भारत एक्स्प्रेसने अवघ्या ७ तासांत पार केले. या मार्गावर सर्वात वेगवान एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाणारी तेजस एक्स्प्रेस आठ तासांहून अधिक वेळ घेते. मात्र वंदे भारत एक्स्प्रेसच्या चाचणीतच विक्रमी प्रवासाची वेळ नोंदवण्यात आली. त्यामुळे रेल्वेने मुंबई-गोवा प्रवास करण्यासाठी कमीत कमी एक तासाची बचत होण्याची शक्यता आहे.

चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) मधील भारतीय बनावटीची सेमी-हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस आहे. देशातील सर्वात पहिली वंदे भारत एक्स्प्रेस फेब्रुवारी २०१९ मध्ये नवी दिल्ली ते वाराणसीदरम्यान धावली. तर सध्या राज्यात चार वंदे भारत धावत असून पाचवी वंदे भारत सीएसएमटी ते मडगाव चालवण्याचे नियोजन रेल्वे विभागाने केले आहे.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
Konkan route, trains on the Konkan route,
नव्या वर्षात कोकण मार्गावरील रेल्वेगाडीला एलएचबी डबे जोडणार
Kishkindha Kaandam OTT Release
फक्त सात कोटींचे बजेट, कमावले तब्बल ‘इतके’ कोटी; OTT वर रिलीज होतोय ‘हा’ सुपरहिट चित्रपट
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
Democracy media What the audience expects from the media
प्रसारमाध्यमे खरे प्रश्न मांडणार, की आक्रस्ताळ्या चर्चाच दाखवत राहणार?

मंगळवारी मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे ५.५३ वाजता निघाली आणि प्रभावी वेळेत अंतर कापून दुपारी १२.५० वाजता गोव्यात पोहोचली. चाचणी करतेवेळी वंदे भारतचा उल्लेखनीय वेग पाहता भविष्यात मुंबई-गोवा प्रवास अत्यंत वेगवान होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. मुंबई सेंट्रल आणि गांधीनगर यांना जोडणाऱ्या पश्चिम रेल्वे मार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या यशानंतर, मध्य रेल्वे मार्गावर मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर मार्गावर दोन अतिरिक्त गाडय़ा सुरू करण्यात आल्या. या गाडय़ांनी त्यांचा वेग, आराम आणि प्रगत तंत्रज्ञानासाठी याआधीच सर्वत्र प्रशंसा मिळवली आहे.

पर्यटनाला चालना

मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसने मुंबईकर आणि पर्यटकांचा प्रवासाचा अनुभव आणखी बदलण्याची अपेक्षा आहे. मार्गाच्या चाचण्यांनी एक्स्प्रेसची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि प्रवासी सुविधांची कठोर चाचणी घेतली जात आहे. मुंबई आणि गोवा या दोन्ही ठिकाणी पर्यटनाला चालना देण्याची आणि आर्थिक वाढ होणार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्याने दिली.

मंगळवारी रात्रीपर्यंत तपासणी सुरू राहणार असून तपासणीचा आढावा घेऊन निष्कर्ष काढले जातील. तसेच चाचण्यांचा अंतिम अहवाल येत्या काही दिवसांत सादर केला जाईल.

–  रजनीश कुमार गोयल, मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे विभागीय व्यवस्थापक