Vandre East Assembly constituency 2024 Congress Zeeshan Siddique : वांद्रे पूर्व हा मतदारसंघ उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. २००९ साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघावर सुरुवातीपासून शिवसेनेची पकड होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेला हा मतदारसंघ २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या हातून निसटला आणि काँग्रेसच्या ताब्यात गेला. शिवसेनेने केलेल्या एका चुकीमुळे त्यांना त्यांचा बालेकिल्ला गमवावा लागला. आता हा मतदारसंघ काँग्रेसच्या झीशान सिद्दीकी यांच्या ताब्यात आहे. झीशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे. मात्र झीशान सिद्दीकी यांनी काँग्रेसमध्ये थांबणं पसंत केलं आहे. ते देखील अजित पवार गटात प्रवेश करू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय.

शिवसेनेचे प्रकाश उर्फ बाळा सावंत यांची या मतदारसंघावर (Vandre East Assembly constituency) पकड होती. ते वांद्रे पूर्वेकडील एका वॉर्डमधून १९९७ ते २००९ पर्यंत नगरसेवक होते. २००९ मध्ये त्यांना शिवसेनेने येथून विधानसभेचं तिकीट दिलं आणि सावंतांनी ही निवडणूक जिंकली. २०१४ साली पुन्हा एकदा शिवसेनेच्या तिकीटावर ते येथून आमदार म्हणून विधानसभेवर गेले. मात्र त्यानंतर काही महिन्यांनी त्यांचं निधन झालं. बाळा सावंतांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. शिवसेनेने बाळा सावंतांची पत्नी तृप्ती सावंत यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली. तर, काँग्रेसने नारायण राणे यांना या मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होतं. मात्र सावंत यांनी नारायण राणेंचा तब्बल १९ हजार मतांनी पराभव केला.

Neelam gorhe statement
Neelam Gorhe: ‘कधीही ब्रेकिंग न्यूज मिळू शकेल’, शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांचं अजित पवार गटाबाबत सूचक विधान
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Who is next chief minister of Haryana
Haryana Exit Poll: सत्ता टप्प्यात दिसताच काँग्रेससमोर मुख्यमंत्री पदाचा पेच; पद एक, दावेदार अनेक
manju hooda bjp candidate haryana assembly election 2024
Haryana Assembly Election: वडील पोलीस अधिकारी, पती सराईत गुन्हेगार आणि निवडणुकीत सामना थेट माजी मुख्यमंत्र्यांशी; कोण आहेत मंजू हुड्डा?
Teosa Vidhan Sabha Constituency Assembly Election 2024
Teosa Vidhan Sabha Constituency : यशोमती ठाकूर यांच्यासमोर आव्हान कोणाचे ?
Sangamner Assembly Election 2024
Sangamner Assembly Election 2024 : बाळासाहेब थोरात पुन्हा वर्चस्व राखणार का? महायुतीचा उमेदवार कोण असणार? कसं आहे संगमनेरचं राजकीय गणित?
PM Narendra Modi in Haryana Election
पंतप्रधान मोदींनी उल्लेख केलेल्या ‘खर्ची’, ‘पर्ची’चा अर्थ काय? हरियाणा निवडणुकीत हा मुद्दा का गाजतोय?
mentality of Congress is to end reservation in country bjp mp anurang thakur attack on rahul gandhi
पुणे :आरक्षण संपवणे ही काँग्रेसची मानसिकता, भाजपच्या खासदाराचा घणाघात

हे ही वाचा >> काँग्रेस मालाड पश्चिमचा गड राखणार की महायुती मुसंडी मारणार?

शिवसेनेतील अंतर्गत वादाचा काँग्रेसला फायदा, यावेळी मविआतील संगर्षामुळे नुकसान होणार?

नारायण राणेंसारख्या मोठ्या नेत्याचा पराभव करणाऱ्या तृप्ती सावंत यांच्याकडे पक्षाने २०१९ च्या निवडणुकीवेळी दुर्लक्ष केलं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने तृप्ती सावंत यांना विधानसभेचं तिकीट दिलं नाही. शिवसेनेने मुंबई महापालिकेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना विधानसभेच्या रिंगणात उतरलं. पक्षाच्या या निर्णयामुळे तृप्ती सावंत नाराज झाल्या आणि त्यांनी ही निडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला. याचे शिवसेनेला गंभीर परिणाम भोगावे लागले. उद्धव ठाकरे ज्या मतदारसंघातील मतदार आहेत तोच मतदारसंघ शिवसेनेने गमावला. त्या निवडणुकीत ना शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला, ना तृप्ती सावंत विजयी झाल्या. शिवेसनेतील अंतर्गत वादाचा काँग्रेसला फायदा झाला. काँग्रेसचे झीशान सिद्दीकी येथून आमदार म्हणून निवडून आले.

हे ही वाचा >> घाटकोपर पश्चिम मतदारसंघात महायुतीची वाट खडतर, लोकसभेनंतर चिंता वाढली!

दरम्यान, पुढच्या महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ही जागा महाविकास आघाडीत काँग्रेसला मिळणार की शिवसेनेच्या ठाकरे गटाला हा प्रश्न आहे. ही जागा काँग्रेसला सुटल्यास काँग्रेस झीशान सिद्दीकांना पुन्हा उमेदवारी देणार की नवा उमेदवार उभा करणार असाही प्रश्न मतदारांना पडला आहे. तर महायुतीतही ही जागा कोणाला मिळणार हे ठरलेलं नाही. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत झीशान सिद्दीकी अजित पवार गटात गेले तर महायुतीत ही जागा अजित पवारांच्या पक्षाला सुटेल आणि पक्ष सिद्दीकांना येथून उमेदवारी देऊ शकतो. मात्र झीशान सिद्दीकी काँग्रेसमध्येच थांबले तर या जागेवर भजापा व शिंदे गट दावा करू शकतो.

Vandre East Assembly constituency : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल

झीशान सिद्दिकी (काँग्रेस) – ३८,३३७ मतं
विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना) – ३२, ५४७ मतं
तृप्ती सावंत (अपक्ष) – २४,०७१ मतं

हे ही वाचा >> जोगेश्वरी पूर्व मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच, मविआतही संघर्ष! यंदा नवा आमदार मिळणार

Vandre East Assembly constituency : २०१५ च्या पोटनिवडणुकीचा निकाल

तृप्ती सावंत (शिवसेना) – ५२,७११ मतं
नारायण राणे (काँग्रेस) – ३३,७०३ मतं

हे ही वाचा >> Andheri East Assembly Constituency : ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात महायुतीची ताकद पणाला, भाजपा-शिंदेंना आव्हान पेलणार का?

Vandre East Assembly constituency : २०१४ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल

प्रकाश सावंत (शिवसेना) – ४१,३८८ मतं
कृष्णा पारकर (भाजपा) – २५,७९१ मतं

हे ही वाचा >> Mankhurd Shivaji Nagar Assembly Constituency : सपाच्या अबू आझमींसमोर महायुतीचा निभाव लागणार का?

Vandre East Assembly constituency : २००९ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल

प्रकाश सावंत (शिवसेना) – ४५,६५९ मतं
जनार्दन सावंत (काँग्रेस) – ३८,२३९ मतं