मुंबई : कलाकार म्हणून सर्जकतेच्या नवनव्या वाटा चोखाळत राहणाऱ्या, अभिनयापासून लिखाणापर्यंत कुठल्याच बाबतीत साचेबद्ध चौकटीत अडकणे मान्य नसणाऱ्या अभिनेते पंकज कपूर यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू ‘लोकसत्ता गप्पां’च्या नव्या पर्वात उलगडणार आहेत.

लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन या तिन्ही क्षेत्रांत विविध माध्यमांतून मुशाफिरी करणाऱ्या पंकज कपूर यांच्यासारख्या अस्सल कलावंताशी शनिवारी, १ मार्च रोजी गप्पांची मैफल रंगणार आहे.

रंगभूमीवरून मिळालेले अभिनयाचे बाळकडू आणि ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून घेतलेले शास्त्रोक्त शिक्षण या बळावर पंकज कपूर यांनी चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मालिकांमधून बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिरेखा गाजवल्या. हिंदी चित्रपटांमध्ये मिळणाऱ्या भूमिकांमध्ये साचेबद्धपणा येतो आहे, प्रयोगशीलतेला कमी वाव मिळतो आहे हे जाणवल्यानंतर त्यांनी दूरचित्रवाहिनीकडे मोर्चा वळवला. अभिनयाबरोबरच लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही स्वत:ला अजमावून पाहणाऱ्या पंकज कपूर

यांच्या अनुभवाचे संचित ‘लोकसत्ता गप्पां’च्या माध्यमातून उलगडण्याचे काम प्रसिद्ध अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी करणार आहेत. हा गप्पांचा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठीच राखीव आहे. ‘करमचंद’, ‘जबान संभाल के’, ‘ऑफिस ऑफिस’ यांसारख्या गाजलेल्या मालिका ते ‘मोहन जोशी हाजिर हो’, ‘एक डॉक्टर की मौत’, ‘जाने भी दो यारो’, ‘एक रुका हुआ फैसला’, ‘राख’, ‘मकबूल’ अशा कित्येक चांगल्या चित्रपटांतील भूमिकांसाठी पंकज कपूर ओळखले जातात. सरधोपट चित्रपटांपेक्षा वेगळे विषय, वेगळे चित्रपट यांची कास धरलेल्या पंकज कपूर यांनी विनाकारण स्वत:ला व्यावसायिक मसाला चित्रपटांमध्ये अजमावून पाहण्यापेक्षा सातत्याने कलात्मक, आशयघन चित्रपटांतूनच काम केले. कधी चित्रपट, कधी मालिका, जिथे नवीन काही करण्याची संधी मिळाली ती घेत त्या संधीचे त्यांनी सोने केले.

पंकज कपूर यांच्या अनुभवाचे संचित ‘लोकसत्ता गप्पां’च्या माध्यमातून उलगडण्याचे काम प्रसिद्ध अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी करणार आहेत. हा गप्पांचा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठीच राखीव आहे.

‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून शिक्षण घेतल्यानंतर रंगमंचावर अभिनयाचे धडे घेणारे आणि पुढे आपल्या सहज अभिनयाने बहुढंगी व्यक्तिरेखा गाजवणारे अभिनेते पंकज कपूर यांच्याबरोबर ‘लोकसत्ता गप्पां’ची मैफल रंगणार आहे.

प्रायोजक

सहप्रायोजक : केसरी टूर्स, बीयंग आणि ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड

पॉवर्ड बाय : एम.के. घारे ज्वेलर्स

Story img Loader