स्पर्धा परीक्षा म्हणजे शिकवणी हवीच, कोणतीही शिकवणी न लावता, स्वयंअध्ययन करून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत वसंत दाभोळकर याने यश मिळवले आहे. देशात ७६ वे स्थान त्याने पटकावले आहे. वसंतचे प्राथमिक शिक्षण हे सिंधुदुर्गमधील जिल्हा परीषदेच्या शाळेत झाले. रत्नागिरीतील फिनोलेक्स अॅकडमी ऑफ मॅनेजमेंट अॅंण्ड टेक्नॉलॉजी येथून यांत्रिकी (मेकॅनिकल) शाखेतील अभियांत्रिकीची पदवी त्याने घेतली.
हेही वाचा >>> “ना कोचिंग, ना लाखोंचा खर्च”, यूपीएससीत देशात दुसरी आलेल्या गरिमाने सांगितला यशाचा मंत्र
मात्र, प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय निश्चित असल्यामुळे त्याने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर युपीएससीचा अभ्यास सुरू केला. त्याचे वडील हे एस.टी महामंडळात लिपिक पदावर आहेत तर आई गृहिणी आहे. कोणत्याही प्रकारची खाजगी शिकवणी न लावता त्याने स्वयंअध्ययनावरती भर देऊन तिसऱ्या प्रयत्नात त्याने यश संपादन केले. मला या यशाचे श्रेय माझ्या आई-वडिलांना तसेच मला वेळोवेळी मदत करणाऱ्या शिक्षकांना द्यायचे आहे, अशा भावना वसंत याने व्यक्त केल्या.