महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नाराज नगरसेवक वसंत मोरे यांनी आज मुंबईतील ‘शिवतिर्थ’वर जाऊन पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर पहिली प्रतिक्रिया देताना आपण या भेटीनंतर शंभर टक्के समाधानी आहे असं म्हटलंय. राज ठाकरे यांची ‘शिवतिर्थ’ येथे भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सर्व बोलणं झालं असून उद्या म्हणजेच १२ एप्रिल रोजी होणाऱ्या ठाण्यातील सभेमध्ये सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील असं राज ठाकरेंनी सांगितल्याची माहिती दिली.

नक्की वाचा >> “हॅलो, वसंत मोरे? मुख्यमंत्र्यांना तुमच्याशी बोलायचं आहे”; राज यांनी उचलबांगडी केलेल्या पुण्याच्या माजी मनसे शहराध्यक्षांना फोन

“सगळं बोलणं झालं आहे. उद्या ठाण्याच्या सभेला ये तुला सगळी उत्तर मिळतील असं सांगितलं आहे,” अशी पहिली प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिलीय. तसेच पत्रकारांनी तुम्ही या भेटीनंतर समाधानी आहात का?, असा प्रश्न विचारला असता, मोरेंनी, “मी १०० टक्के समाधानी आहे,” असं सांगितलं.

Pimpri Vidhan Sabha, Sharad Pawar candidate,
पिंपरी विधानसभा : ठाकरेंच्या शिवसैनिकांनी बंडाचा इशारा दिल्यानंतर शरद पवारांच्या उमेदवार काय म्हणाल्या? वाचा..
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Amit Thackeray and Uddhav Thackeray
Amit Thackeray on Uddhav Thackeray : “… अन् दोन भाऊ एकत्र येण्याचा विचार माझ्यासाठी संपला”, अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक पोस्टमध्ये म्हणाले, “सुना है पुराने दोस्तों ने…”
What Kiran Pavasakar Said About Uddhav Thackeray?
Shivsena Vs MNS : “उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबरोबरचं नातं जपायला हवं होतं आणि…”, ‘या’ नेत्याची बोचरी टीका!
amit thackeray
“…तेव्हा माझ्या पोटात गोळा आला”; उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया!
uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंवर बावनकुळेंची टीका; म्हणाले, “आज तीच वेळ…”
Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis?
Uddhav Thackeray Devendra Fadnavis Meet ? : उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची भेट? संजय राऊतांचा अमित शाह यांना फोन? विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?

“मी समाधानी होऊनच इथून चाललोय. मागील दोन तीन दिवसांपासून ज्या काही चर्चा होत्या त्यादरम्यानही मी सांगत होतो की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आहे आणि मनसेमध्येच राहील,” असं वसंत मोरेंनी म्हटलंय. “ज्या अडचणी होत्या त्या दूर झाल्यात का?”, असा प्रश्न मोरेंना विचारण्यात आला. त्यावर, “उद्याची उत्तर सभा आहे उद्याच्या सभेत राज ठाकरे सर्व प्रश्नांची उत्तरं देतील,” एवढं मोजकं उत्तर मोरेंनी दिलं. तसेच, “बाकी जे बोलायचं आहे ते राज ठाकरे पुण्यात येऊन बोलणार आहेत,” असंही मोरे यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> वसंत मोरे झाले मावळा तर साईनाथ बाबर छत्रपती शिवाजी महाराज; मनसे नेत्याचं ‘ते’ WhatsApp Status चर्चेत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मुंबईत झालेल्या जाहीर सभेत मशीदीवरील भोंगे न काढल्यास तिथे हनुमान चालीसा लावू असे विधान केले होते. राज ठाकरे यांच्या त्या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली. त्याचाच पक्षातील पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी उघडउघड नाराजी व्यक्त केली होती. या भूमिकेमुळे वसंत मोरे यांना काही तासात शहराध्यक्ष पदावरून बाजूला केले आणि त्यांच्या जागी मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. या सर्व घडामोडी घडत असताना, वसंत मोरे यांना अनेक पक्षाकडून पक्षात येण्याची खुली ऑफर देण्यात आली होती. या सर्व ऑफर्सबाबत राज ठाकरेंना कल्पना दिल्याचे मोरे यांनी सांगितले होते.

नक्की वाचा >> पुणे शहराध्यक्ष पदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी राज ठाकरेंकडून…”

शहरातील मुस्लिम समाजाचे सर्वाधिक वास्तव्य असलेल्या कोंढवा भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज ठाकरे यांच्या भूमिकेच्या निषेधार्थ आंदोलन करीत राज ठाकरे मुर्दाबाद,तर वसंत मोरे जिंदाबादच्या घोषणा देखील दिल्या होत्या. या सर्व घडामोडी घडत असताना, वसंत मोरे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा निरोप आला. सोमवारी शिवतीर्थ इथे साडेअकरा वाजता भेटण्यास यावे, असं वसंत मोरेंना सांगण्यात आलं. त्यानुसार आज सकाळी कात्रज येथून मुंबईच्या दिशेने रवाना होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधाताना वसंत मोरे यांनी भेटीसंदर्भातील माहिती दिली होती.