मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुटी असली तरी या दिवशी भायखला येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (राणीची बाग) जनतेसाठी खुली राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी २० फेब्रुवारी रोजी राणीची बाग बंद राहणार आहे.

भायखळा (पूर्व) परिसरातील राणीची बाग साप्ताहिक सुटीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र, मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुटी आल्यास त्या दिवशी राणीची बाग जनतेसाठी खुली राहते, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी राणीची बाग बंद ठेवण्यात येते. या ठरावानुसार या आठवड्यात बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी राणीची बाग जनतेसाठी खुली ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.

Story img Loader