राज्याच्या कानाकोपऱ्यातील तरुणाईची स्पंदने नाटय़कलेच्या रूपाने टिपणाऱ्या ‘सॉफ्टकॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचे दुसरे पर्व येत्या २९ सप्टेंबरपासून मोठय़ा दिमाखात सुरू होत आहे. पहिल्या पर्वाचा अनुभव आणि दुसऱ्या पर्वाचा उत्साह अशा आगळ्या आनंदाच्या लहरीवर सुरू होणाऱ्या या स्पर्धेची प्राथमिक फेरी गतवर्षीप्रमाणेच यंदाही मुंबई, ठाणे, पुणे, नगर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, रत्नागिरी अशा आठ केंद्रांवर होणार आहे. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या प्राथमिक फे रीतून निवडलेल्या एकांकिकांना मुंबईत आपली कला सिद्ध करण्याची संधी महाअंतिम फेरीच्या रूपाने मिळेल.
‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा २९ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर दरम्यान होणार असून, या स्पर्धेसाठीची प्रवेशपत्रे गेल्या वर्षी या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या महाविद्यालयांपर्यंत पोहोचली आहेत. यंदा महविद्यालयीन परीक्षा सुरू होण्याआधीच ‘लोकसत्ता लोकांकिका’चे बिगूल वाजणार असल्याने परीक्षेचा ताण, एकांकिकांच्या तालमीसाठी न मिळणारा वेळ अशा सर्व गोष्टी बाजूला सारून तरुणाई या स्पर्धेत तयारीने उतरू शकते. याही वर्षी ‘आयरिस प्रॉडक्शन’ या स्पर्धेसाठी ‘टॅलेंट सर्च पार्टनर’ म्हणून सहभागी होणार असल्याने एकांकिका ते मालिका हे स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे. स्पर्धेच्या फे ऱ्यांबद्दलची सविस्तर माहिती, प्रवेशाची नियमावली आदी तपशील ‘लोकसत्ता’मधून तसेच ‘लोकसत्ता ऑनलाइन’ आवृत्तीतून लवकरच जाहीर करण्यात येईल.
‘लोकसत्ता लोकांकिका’चे दुसरे दिमाखदार पर्व लवकरच..
राज्याच्या कानाकोपऱ्यातील तरुणाईची स्पंदने नाटय़कलेच्या रूपाने टिपणाऱ्या ‘सॉफ्टकॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचे दुसरे पर्व येत्या २९ सप्टेंबरपासून मोठय़ा दिमाखात सुरू होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-07-2015 at 05:41 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Verry soon loksatta lokankika part2