मुंबई : समभागांचे भाव फुगवल्याच्या आरोप झालेले केतन पारेख यांच्यासह एका महिलेविरोधात वर्सोवा पोलिसांनी शनिवारी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. समभागामध्ये गुंतवून अधिकाधिक फायदा मिळवून देण्याचे आमीष दाखवून स्टॉक ब्रोकरची सव्वा दोन कोटींची फवसणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. गुंतवणूकीसाठी दिलेली रक्कम आरोपी महिला व पारेखने समभागांमध्ये पैसे न गुंतवता त्याद्वारे महागडी रेंजरोवर मोटरगाडी खरेदी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्सोवा पोलिसांनी भादंवि कलम ४०६ (विश्वासघात), ४२० (फसवणूक) आणि ३४ (सामान्य उद्देश) या कलमांखाली महिला आणि केतन पारेख विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार ४७ वर्षीय शेअर बाजार गुंतवणूक करणारे असून ते अंधेरी (पश्चिम) येथे राहतात. २०१५ साली तक्रारदाराची ३७ वर्षीय आरोपी महिलेशी पहिली भेट खारमधील एका हॉटेलमध्ये झाली. त्यावेळी त्यांनी एकमेकांना संपर्क क्रमांक दिले. त्यानंतर ते नियमीत संपर्कात होते. त्यामुळे दोघे लवकरच चांगले मित्र झाले.

हेही वाचा : तरुणांमधील उच्च कोलेस्टेरॉल पातळी देते भविष्यातील हदयविकारांना आमंत्रण!

तक्रारदार आणि महिला २०१८ आणि २०१९ मध्ये खार येथील हॉटेलमध्ये एकत्र राहत होते. करोनाच्या काळात तक्रारदार सुरतमध्ये राहण्यासाठी गेले. डिसेंबर २०२० मध्ये महिलेने बांद्रा येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तक्रारदाराची ओळख केतन पारेखशी करून दिली. पारख हे सीकोस्ट, पेसालो डिजिटल आणि स्पेसनेट या कंपन्यांचे शेअर ऑपरेटर असल्याचे महिलेने सांगितले. तक्रारदाराने शेअर मार्केटसंबंधीत गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असल्यामुळे पारेख यांच्याबद्दल आधीच ऐकले होते. जून २०२१ मध्ये महिलेने तक्रारदाराला तिच्या नावाने केतन पारेख यांच्यामार्फत शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आणि त्यात मोठा नफा मिळेल असे सांगितले. महिलेच्या या प्रस्तावावर विश्वास ठेवून तक्रारदाराने २० जून २०२१ रोजी तिच्या घरी ५५ लाख रुपये गुंतवणुकीसाठी दिले. महिलेने ती रक्कम सीकोस्ट कंपनीत गुंतविल्याचे सांगितले. त्याच दिवशी तिने पैसे पारेख यांना मरीन प्लाझा हॉटेलमध्ये दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर महिलेच्या आग्रहावरून तक्रारदाराने नोव्हेंबर २०२१ मध्ये तिच्या बँक खात्यात ७१ लाख ८५ हजार रुपये जमा केले. हे पैसे मिळवण्यासाठी तक्रारदाराने कुटुंबातील दागिने विकले. त्यानंतर महिलेने त्याच्या पैशांतून नवीन रेंज रोव्हर मोटरगाडी खरेदी केल्याचे तक्रारदाराला समजले. त्यावेळी पारेखने तिच्या वाढदिवसासाठी तिला मोटरगाडी भेट दिल्याचे महिलेने सांगितले. तसेच तक्रारदाराचे पैसे सुरक्षित असल्याचेही तिने सांगितले.

हेही वाचा : दादरमधील महिलेची पावणेसहा कोटींची सायबर फसवणूक,सायबर पोलिसांनी आरोपीला पुण्यातून केली अटक

जानेवारी आणि जून २०२२ मध्ये तक्रारदाराने महिलेच्या खात्यात आणखी ४९ लाख रुपये जमा केले. पेसालो डिजिटल कंपनीचे शेअर्स करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने २०२३ मध्ये मे, जुलै आणि सप्टेंबरमध्ये ३७ लाख रुपये रोख दिले. त्यावेळी महिलेने स्पेसनेट कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले होते. पण तक्रारदाराने गुंतवलेल्या पैशांबाबत विचारले असता महिला आणि पारेख दोघांनीही त्याला टाळणे सुरू केले. त्यांच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून तक्रारदार २५ डिसेंबर २०२३ ला पारेखच्या घरी गेले होते. त्याच दिवशी पारेखने तक्रारदाराला मरीन प्लाझा हॉटेलमध्ये भेटण्यास सांगितले आणि त्या भेटीत पारेखने ४२ लाख रुपये परत करण्याचे आश्वासन दिले. पण अद्याप तक्रारदाराला रक्कम मिळाली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलीस अधिक तपास करत आहेत.