मुंबई – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वर्सोवा – विरार सागरी सेतूच्या व्यवहार्यता अभ्यास अहवालाचे स्वतंत्र सल्लागारामार्फत समवयस्क पुनरावलोकन (पीअर रिव्ह्यू) करण्याचा निर्णय घेतला आहे. सल्लागाराच्या नियुक्तीसाठी नुकत्याच आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा जारी करण्यात आल्या आहेत. या सागरी सेतूला जोडणाऱ्या विरार – पालघर नियंत्रित मार्गिकेची व्यवहार्यताही याच समवयस्क पुनरावलोकनाअंतर्गत तपासण्यात येणार आहे. यासंबंधीचा अहवाल आल्यानंतर देशातील सर्वाधिक लांबीच्या आणि महागड्या अशा सागरी सेतूचा सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्याचेही पुनरावलोकन आंतरराष्ट्रीय स्तरावरील सल्लागारामार्फत करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी, तसेच मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी ४२.७५ किमी लांबीच्या वर्सोवा – विरार सागरी मार्गाचे बांधकाम एमएमआरडीए करणार आहे. मुळात हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा (एमएसआरडीसी) होता. मात्र राज्य सरकारने आर्थिक अडचणींमुळे हा प्रकल्प ‘एमएमआरडीए’कडे सोपविला. दरम्यान, ‘एमएसआरडीसी’ने नियुक्त केलेल्या मे. पेंटॅकल-सेमोसा कंपनीने या प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास केला आहे. मात्र ही सल्लागार कंपनी राष्ट्रीय स्तरावर काम करणारी आहे. हा प्रकल्प सर्वात मोठा, तसेच सर्वाधिक महागडा असल्याने ‘एमएमआरडीए’ने आंतरराष्ट्रीय सल्लागाराच्या माध्यमातून व्यवहार्यता अभ्यास अहवालाचे समवयस्क पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. दरम्यान, पेंटॅकल-सेमोसा कंपनी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करणार आहे. या आराखड्याचे समवयस्क पुनरावलोकन करण्यात येणार आहे. या दोन्ही कामांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सल्लागाराची नियुक्ती करण्याकरीता निविदा जारी करण्यात आल्याचेही श्रीनिवास यांनी सांगितले.

हेही वाचा – मुंबई : रुग्णालयांत औषध तुटीचे संकट? देयकाची रक्कम थेट उत्पादक कंपनींच्या खात्यात जमा होत असल्याने वितरक संतप्त

व्यवहार्यता अभ्यास अहवाल आणि पुढे तयार करण्यात येणाऱ्या आराखड्याचे पुनरावलोकन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सल्लागाराची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव एमएमआरडीएने प्राधिकरणाच्या १५४ व्या बैठकीत ठेवला होता. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ‘एमएमआरडीए’ने तात्काळ पुढील कार्यवाही करीत यासाठी निविदा जारी केली. आता पुढील काही महिन्यात पुनरावलोकन अभ्यास पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर आराखडा तयार करण्यात येईल. या आराखड्याचेही पुनरावलोकन केले जाईल.

वर्सोवा – विरार सागरी सेतूचा पालघरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. विरार – पालघर अशी नियंत्रित मार्गिका बांधून (जोडरस्ता) हा विस्तार केला जाणार आहे. राज्य सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता विरार – पालघर अशा नियंत्रित मार्गिकेचाही व्यवहार्यता अभ्यास केला जाणार आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याचेही श्रीनिवास यांनी सांगितले.

हेही वाचा – केरळ रेल्वे आग प्रकरण : रत्नागिरी रेल्वे स्थानकात झोपलेल्या आरोपीला अटक

१०० किमीहून अधिक लांबीचा प्रकल्प?

वर्सोवा – विरार सागरी सेतू ४२.७५ किमी लांबीचा आणि आठ मार्गिकांचा (येण्यासाठी चार, जाण्यासाठी चार) असणार आहे. या सागरी सेतूला चारकोप, उत्तन, वसई आणि विरार असे चार, एकूण ५२ किमीचे आंतरबदल मार्ग असणार आहेत, त्यामुळे वर्सोवा – विरार सागरी सेतू एकूण ९५ किमी लांबीचा प्रकल्प असणार आहे. तर याचा पालघरपर्यंत विस्तार झाल्यास हा प्रकल्प १० ते ११ किमीने वाढणार आहे. त्यामुळे भविष्यात हा प्रकल्प १०० किमीहून अधिक लांबीचा प्रकल्प असणार आहे. एकूणच हा ४२ किमी लांबीचा सागरी सेतू देशातील सर्वात मोठा सागरी सेतू असणार आहे. या प्रकल्पासाठी ६३ कोटी ४२६ लाख रुपये खर्च येणार आहे.