देशभक्तीपर चित्रपटांमधून नायकाची भूमिका साकारत ‘भारत कुमार’ अशी ओळख मिळवलेल्या मनोज कुमार यांची प्रकृती बुधवारी खालावली. त्यांना अंधेरी येथील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मनोज कुमार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली; मात्र त्यांच्या प्रकृतीबद्दल अधिक काही बोलण्यास नकार दिला. मनोज कुमार यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती जाहीर करण्यास मनाई केल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. ‘पूरब और पश्चिम’, ‘क्रांती’, ‘शहीद’, ‘उपकार’, ‘वह कौन थी?’ अशा काही चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran actor manoj kumar hospitalised