मुंबई : पन्नास ते सत्तरच्या दशकात हिंदूी चित्रपटसृष्टीत अभिनेते सुनील दत्त, किशोर कुमार, आशा पारेख, शर्मिला टागोर यांच्यासारख्या नामवंत कलाकारांबरोबर काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे नुकतेच दक्षिण मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. गेली कित्येक वर्षे त्या मूत्रिपडाच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सून व नातू असा परिवार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मूळच्या पुण्याच्या असलेल्या आशा नाडकर्णी १९५७ मध्ये आपल्या कुटुंबासह मुंबईत स्थायिक झाल्या. मुंबईत आल्यानंतर वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षांपासून त्या हिंदूी चित्रपटात काम करू लागल्या. प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी त्यांना आपल्या ‘मौसी’ या चित्रपटात पहिली संधी दिली होती. व्ही. शांताराम यांच्या ‘नवरंग’ चित्रपटाबरोबर ‘गुरू और चेला’, ‘चिराग’, ‘फरिश्ता’, ‘श्रीमानजी’, ‘दिल और मोहब्बत’, ‘अलबेला मस्ताना’ अशा विविध हिंदूी चित्रपटांतून त्यांनी काम केले. मराठीतही ‘श्रीमान बाळासाहेब’, ‘क्षण आला भाग्याचा’, ‘मानला तर देव’ सारख्या चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran actress asha nadkarni passed away mumbai amy