ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री लक्ष्मण माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.”लक्ष्मण माने यांच्यामुळे राज्यातील प्रत्येक वाडीवस्तीवर राष्ट्रवादी काँग्रेस पोहोचेल. त्यांचे प्रश्न आम्ही सरकार दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देऊ. पुन्हा एकदा राष्ट्रवादीला गतवैभव आल्याशिवाय राहणार नाही”, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

हेही वाचा- मेधा सोमय्यांची मानहानीची तक्रार : जबाब नोंदवण्यासाठी ६ ऑगस्ट रोजी हजर राहा – शिवडी न्यायालयाचे संजय राऊत यांना आदेश

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”
JP Singh met Afghanistan Interim Defense Minister Maulana Mohammad Yakub in Kabu
तालिबानी राजवटीशी पहिलाच संवाद!
kalyan east shinde shiv sena city chief mahesh gaikwad including nine expelled from shiv sena
कल्याण पूर्वेतील बंडखोर शहरप्रमुख महेश गायकवाड; यांच्यासह नऊ जणांची शिवसेनेतून हकालपट्टी
Loksatta chavadi political drama in maharashtra
चावडी: बंटी पाटील एवढे का संतापले?
Narendra modi urban naxal
मोदीजी, एकसाचीपणाचे तुमचे उद्दिष्ट असाध्यच नव्हे, अयोग्यही आहे…

उपेक्षित घटकाला न्याय देण्याचे काम महाविकास आघाडीने केले

लक्ष्मण माने यांनी शरद पवारांची भेट घेऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर गेली अनेक वर्ष लक्ष्मण माने हे राज्यातील भटक्या विमुक्त वंचित घटकांसाठी काम केले आहे. प्रतिकूल परिस्थितीत गेली ३० ते ४० वर्ष वाड्यावस्त्यांवर जाऊन वंचित घटकांना एकत्र करत आहेत. न्याय मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत. शरद पवारांनी आजवर समाजातील नाही रे वर्गासाठीच अधिक निर्णय घेतले आहेत. समाजात अजूनही असा मोठा वर्ग आहे, ज्यांना न्याय मिळालेला नाही. त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असेही पाटील म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत असताना पवारांनी अल्पसंख्याक विकास आणि सामाजिक न्याय ही दोन खाती मागून घेतली होती. दोन्ही खात्यामार्फत समाजातील उपेक्षित घटकाला न्याय देण्याचे काम आमच्या सरकारने केले असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा- “काँग्रेस राष्ट्रवादीला म्हणावं आता तुम्ही तुमचे आमदार सांभाळा, शिवसेनेची…”; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा

३३ वेगवेगळ्या जातींचा उल्लेख अर्थसंकल्पात

लक्ष्मण माने यांनी सूचवल्यानंतर ३३ वेगवेगळ्या जातींचा उल्लेख अर्थसंकल्पात करुन त्यांच्यासाठी विशेष तरतूद केली. त्यावेळी महाराष्ट्राचा सामाजिक न्यायाचा अर्थसंकल्प म्हणून तो प्रसिद्ध झाला. वंचितांपर्यत पोहोचून आम्ही जे काम केले त्यामुळे २००४ साली विक्रमी संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आल्याचेही पाटील म्हणाले.

संविधानविरोधी काम करणाऱ्यां विरोधात लढा

हे वर्ष स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव म्हणून साजरे करण्यात येत आहे. तसेच छत्रपती शाहू महाराजांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या वर्षांचे निमित्त साधून ३१ ऑगस्ट रोजी विमुक्त दिन साजरा करायचा आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा मेळावा होईल, असे लक्ष्मण माने यांनी जाहीर केले. भारताची लोकशाही सध्या धोक्यात असून आपला लढा संविधानविरोधी काम करणाऱ्यां विरोधात आहे. हा लढा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला साथ द्यावी, असे आवाहनही माने यांनी केले. लक्ष्मण माने यांच्यासमवेत विलास माने, नारायण जावलीकर, शारदाताई खोमणे, अशोकराव जाधव यांच्यासह १८ जणांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.