लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : ज्येष्ठ नाट्य लेखक आणि दिग्दर्शक आनंद म्हसवेकर यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. आज सायंकाळी त्यांच्या ‘मु. पो. वडाचे म्हसवे ते यु.एस.ए’ या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात येणार होते. त्यांच्या पार्थिवावर डोंबिवली येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

marathi actress suhas joshi
व्यक्तिवेध: सुहास जोशी
Daily Horoscope 12th October 2024 Rashibhavishya in Marathi | dasara 2024
१२ ऑक्टोबर पंचांग: दसऱ्याला मीनसह ‘या’ राशींवर धन-सुखाची…
suhasini joshi
अभिनेत्री सुहास जोशी यांना विष्णुदास भावे गौरवपदक
marathi movie naad will release on october 25
Marathi Film ‘Naad’ Release Date : ‘नाद’ चित्रपट २५ ऑक्टोबरला रूपेरी पडद्यावर
Marathi actors reaction on Union cabinet on approved granting classical language status to Marathi
“फक्त उत्सव नाही…”, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केल्यानंतर क्षितिज पटवर्धनसह मराठी कलाकारांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
Famous writer and director Madhura Jasraj passed away
प्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका मधुरा जसराज यांचे निधन
Dhananjay Powar And Manoj Bajpayee
“डीपी मला ‘सत्या’ सिनेमातील भिकू म्हात्रे वाटतो”, प्रसिद्ध दिग्दर्शकाचे धनंजय पोवारबद्दल वक्तव्य; म्हणाले, “मनोज बाजपेयी जर …”
Prabhatai, Hariprasad Chaurasia, Prabhatai Atre,
संगीत हेच प्रभाताईंचे पहिले प्रेम, पं. हरिप्रसाद चौरासिया यांची भावना

सातारा जिल्ह्यातील म्हसवे या गावात त्यांचा जन्म झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी. कॉम आणि एम.ए ची पदवी प्राप्त केली होती. १९७९ ते २००० सालापर्यंत म्हसवेकर हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ लेखनासाठी झोकून दिले. त्या दरम्यान, त्यांनी ‘यू टर्न’, ‘कथा’, ‘जोडी जमली तुझी माझी’, ‘ केंव्हा तरी पहाटे’ यांसारख्या ३८ नाटकांचे लिखाण केले. तर, ‘असा मी काय गुन्हा केला’, ‘भरत आला परत’, ‘दुर्गा म्हणत्यात मला’, ‘जन्म’, ‘आम्ही बोलतो मराठी’, ‘साद’, ‘तृषार्त’, ‘झेंटलमन’ आदी चित्रपटांचेही लेखन केले. त्याचबरोबर, ‘या गोजिरवाण्या घरात’ आणि ‘चार दिवस सासूचे’ या मालिकांचे लेखनही त्यांनी काही काळ केले होते. लेखनाबरोबरच म्हसवेकर यांनी ‘असा मी काय गुन्हा केला’ आणि ‘आम्ही बोलतो मराठी’ या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते.

आणखी वाचा-Raj Thackeray : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “बाहेरच्या राज्यातून…”

म्हसवेकर यांच्या यू टर्न या नाटकासाठी त्यांना ‘झी नाट्य गौरव सर्वोत्कृष्ट लेखकाचा’ २००९ साली पुरस्कार देण्यात आला होता. तसेच, ‘महाराष्ट्र राज्य शासन अभ्यासक नाट्य महोत्सवात सर्वोत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शक’, ‘मुंबई मराठी साहित्य संघाचा उत्कृष्ट लेखक’, ‘चतुरंग सवाई लेखक’, ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शक’ आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.