एलफिन्स्टन परिसरातील बुधकर मार्गावरील व्हिक्टोरिया हाऊस इमारतीचा आज (सोमवार) दुपारी बाराच्या सुमारास स्लॅब कोसळला. या दुर्घटनेमध्ये एक व्यक्ती ठार झाली असून आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी केईएन रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
इमारतीच्या आतील भागाच्या दुरुस्तीचं काम सुरु असताना ही घटना घडली. ढिगारा उपसण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असून आणखी एक व्यक्ती ढिगा-याखाली अडकली असण्याची शक्यता अग्निशमन दलाच्या अधिका-यांकडून व्यक्त केली जात आहे.

Story img Loader