आपला समाज कितीही प्रगत झाला तरी अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला समाजाला प्रगती करण्यापासून सतत अडवत असतात. यामध्ये स्त्रीभ्रूण हत्या, समानता, जातीभेद, स्त्री साक्षरता अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. यातच आणखी एक गोष्ट येते ती म्हणजे अंधश्रद्धा. आपण कितीही साक्षर असलो तरीही काही बाबतीत आपण अंधश्रद्धेला बळी पडतोच. म्हणूनच एकविसाव्या शतकातही अनेक भोंदू बाबा, साधूंचा फायदा होतो. त्यांना मानणारा एक मोठा गट अजूनही आपल्या समाजात आहे.
आज आपण अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणाऱ्या २८ वर्षीय स्वप्निल शिरसाठ या तरुणाबद्दल जाणून घेणार आहोत. स्वप्निलला आपल्या समाजातून अंधश्रद्धा नाहीशी करायची आहे. गेल्या तीन वर्षांत ३५० कार्यक्रमांद्वारे त्याने अंधश्रद्धा निर्मूलन आणि प्रबोधनाचं काम केलंय. स्वप्निलच्या या असामान्य कार्याबद्दल जाणून घेऊया.
स्वप्निल अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम तर जातोच, सोबतच तो शाहीर देखील आहे. समाजातील समस्यांवर तो शाहीरीच्या माध्यमातून प्रबोधन करतो. ‘साद फाऊंडेशन’ संस्थेद्वारे तो गेली ७ वर्ष सामाजिक कार्य करत आहे. दोन वर्षांपूर्वी ‘ह्युमन सर्वर मल्टिपल ऑरगनायझेशन’ ही स्वत:ची सामाजिक संस्था देखील त्याने सुरू केली आहे.
गोष्ट असामान्यांची या मालिकेचे इतर भाग बघण्यासाठी येथे क्लिक करा.