ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपूत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. दहिसर येथील त्यांच्या कार्यालयात मॉरिसभाई नावाच्या व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्याचं माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी सांगितलं. या गोळीबारात अभिषेक यांच्यावर दोन-तीन गोळ्या झाडल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, या हत्येचा थरार फेसबूकवरून लाईव्ह करण्यात आला आहे. मॉरिसभाई यांनीच त्यांच्या फेसबुकवरून हे लाईव्ह केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हीडिओत काय दिसतंय?

अभिषेक घोसाळकर यांनी मॉरिसभाई नावाच्या व्यक्तीबरोबर फेसबुक लाईव्ह केलं होतं. मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना त्यांच्याच कार्यालयात एका कार्यक्रमाकरता बोलावलं होतं. यानिमित्ताने ते फेसबुक लाईव्हवरून संवाद साधत होते. संवाद संपल्यानंतर सुरुवातीला मॉरिस उठून निघून गेला. त्यानंतर, अभिषेक घोसाळकर लाईव्हद्वारे संवाद साधत होते. “ही तर फक्त सुरुवात आहे. आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे”, असं अभिषेक घोसाळकर फेसबुक लाईव्हमध्ये बोलत होते. त्यांचा हा संवाद संपताच अभिषेक घोसाळकरही जागेवरून उठले. ते उठताच त्यांच्यावर गोळीबार झाला. ते उठून गेल्यानंतर गोळ्यांचा आणि ओरडण्याचा आवाज व्हीडिओतून येत आहे. एवढंच नव्हे तर गोळीबार झाल्यानंतरही फेसबुक लाईव्ह पाऊणतास सुरूच होतं.

या घटनेविषयी माहिती देताना माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद म्हणाले, “दहिसरमध्ये अनंत गिते, विनोद घोसाळकर आणि मी एका कार्यक्रमात होतो. तेव्हा काही कार्यकर्ते आमच्याकडे धावत आले आणि आम्हाला गोळीबाराची माहिती दिली. गोळीबाराच्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष नव्हतो. तिथे दुसरे कार्यकर्ते होते. त्यांना आता रुग्णालयात दाखल केलंय. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

हेही वाचा >> VIDEO : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक

दरम्यान, अभिषेक घोसाळकर यांच्यावर करुणा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबाराच्या आवाजाने कार्यालयातील काचाही फुटल्याचे फुटेज समोर आले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून ते अधिक तपास करत आहेत.

मॉरिसची आत्महत्या

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार मॉरिस नोरोन्हा याने अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या त्यानंतर त्याने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली.

कोण होता मॉरिस?

मॉरिस नावाचा इसम दहिसर- बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती आहे. स्थानिक राजकीय वर्तृळात मॉरिस नावाच्या व्यक्तीला स्वयंघोषित नेता म्हणून ओळखले जायचे. गणपत पाटील नगरमध्ये मॉरिस काम करत होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video in front of the thrill of firing on abhishek ghosalkar the attacker did it live from his own facebook sgk
Show comments