Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून हे वादळ आता कमकुवत झाले असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार १५ जून रोजी बिपरजॉय हे चक्रीवादळ ताशी १२५ ते १३५ किमी वेगाने गुजरात आणि पाकिस्तानला धडकण्याचा अंदाज आहे. दरम्यान, या वादळाचा परिणाम म्हणून मुंबईतील समुद्र खवळला आहे. वरळी सी फेसला उंचच उंच लाटा निर्माण होत असून समुद्रात मोठी भरती निर्माण झाली आहे. परिणामी, मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा >> Cyclone Biparjoy : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ६७ रेल्वे गाड्या रद्द, वॉर रुमही सज्ज

rain forecast for two days in vidarbha central maharashtra
विदर्भ, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज; जाणून घ्या, बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Massive fire breaks out in Kurla news in marathi
कुर्ल्यातील उपाहारगृहात भीषण आग
congress mla vijay wadettiwar criticize cm devendra fadnavis over crime increase in state
चंद्रपूर : वडेट्टीवार म्हणतात, ‘मुख्यमंत्री फडणवीसांचा धाक नाही, त्यामुळेच गुन्हेगारी…’
imd predicted possibility unseasonal rains in maharashtra
राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट! ; हवामान खाते…
Mumbai minimum temperature drops,
मुंबईच्या किमान तापमानात घट
Mumbais maximum temperature rise with Santacruz recording 35 Celsius
मुंबईकर घामाघूम
climate turmeric impact loksatta
हवामान प्रकोपाचा हळदीला फटका; जाणून घ्या, देशभरात लागवड किती घटली, उत्पादनात किती घट येणार

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, “मुंबईतील वरळी सीफेसवर भरतीमुळे मोठ्या लाटा उसळत आहेत. तर, आज मुंबई शहर आणि उपनगरात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच, आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. अधूनमधून वादळी वारा सुटण्याचीही शक्यता आहे. या वाऱ्याचा वेग ४५-५५ किमी प्रतितास असू शकतो. तर, मुंबई शहर आणि उपनगरात दमट वातावरण राहण्याचीही शक्यता आहे. दरम्यान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेचे आपत्कालीन विभाग सज्ज आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दक्षिण मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात पावसाच्या तुरळक सरी कोसळत असल्याने हवामानात गारवा आहे. परंतु, ठाण्यापलीकडे पावसाला सुरुवात न झाल्याने तिथे अद्यापही काहिली जाणवत आहे. तर, पालघर जिल्हा प्रशासनाने सोमवारी ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर १३ जून ते १५ जून या कालावधीत किनारपट्टीजवळ जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

दरम्यान, यंदा सात जून रोजी पावसाचे अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु, बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनला उशीर झाला आहे. सर्वाधिक काळ अरबी समुद्रात घोंघावलणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने गेले असल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. परंतु, मॉन्सूनपूर्व पाऊस न झाल्याने शेतकीर चिंताग्रस्त झाले आहेत.

गुजरातमध्ये ऑरेंज अलर्ट

बिपरजॉय चक्रीवादळामुळे १५ आणि १६ जून रोजी कच्छ आणि गुजरातच्या काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकलं असून अरबी समुद्राला उधाण आल्याचं दिसत आहे. त्यामुळे गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Story img Loader