अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्यानिमित्ताने उद्धव ठाकरे गट आणि भारतीय जनता पार्टीकडून आज मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. या अर्ज भरण्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राज्यातील दुसऱ्या फळीतील अनेक नेते आज अंधेरीमधील निवडणूक आयोगाच्या केंद्रावर उपस्थित होते. याचवेळी भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटाला लक्ष्य करताना त्यांच्या नव्या निवडणूक चिन्हावरुन म्हणजेच ‘मशाली’संदर्भात भाष्य केलं. ठाकरेंना मिळालेलं चिन्ह मशाल नसून आईस्क्रीमचा कोन असल्याचा टोला नितेश राणेंनी लागवला. त्यावरच शिवसेनेनी जसेच्या तसे उत्तर दिले आहे.
नक्की वाचा >> “माझा भाऊ कॉप्या करुन…”; मुख्यमंत्री शिंदेंचा ‘ढ’ असा उल्लेख करत सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
राणे नेमकं काय म्हणाले?
प्रसारमाध्यमांनी उद्धव ठाकरेंच्या गटाला देण्यात आलेल्या नव्या चिन्हासंदर्भात नितेश राणेंना प्रश्न विचारला असता त्यांनी ही मशाल नसून आईस्क्रीमचा कोन असल्याचा टोला लगावला. तसेच हे चिन्ह उद्धव ठाकरेंना का देण्यात आलं यासंदर्भातील कारणही त्यांनी सांगितलं. “उद्धव ठाकरे या माणसाचं चिन्ह हे मशाल नाही कारण त्याच्यातली आग कधीच विझली आहे. खरं तर आईस्क्रीमचा कोन मिळाला आहे जो थंड पडलेला आहे,” असं नितेश राणे म्हणाले. “मशाल नाहीच आहे की आइस्क्रीमचा कोन आहे. उद्धव ठाकरेचं मशाल हे चिन्ह होऊच शकत नाही. त्या माणसामधली आग संपलेली आहे,” असंही नितेश राणेंनी म्हटलं.
नक्की वाचा >> ‘भाजपाची ढाल अन् गद्दारांची तलवार’ टीकेवरुन फडणवीस संतापले; ठाकरे गटाला लक्ष्य करत म्हणाले, “याहून मोठी गद्दारीच…”
“हा माणूस थंड पडला आहे. आग पूर्णपणे विझलेली आहे हे कदाचित निवडणूक आयोगाच्या लक्षात आलं. हा थंड माणूस आहे त्याच्या हातात आईस्क्रीमचा कोन द्या असं आयोगाला वाटलं. म्हणूनच निवडणूक आयोगाने आइस्क्रीमचा कोन दिला. आता तो कोन घेऊन फिरेल तो आणि त्याचा मुलगा,” असा टोमणा नितेश राणेंनी लगावला. शिवसेनेमध्ये पडलेली उभी फूट त्यानंतर पक्षावरील दाव्यावरुन झालेला वाद. वादानंतर दोन्ही गटांना शिवसेना नाव वापरण्यास निवडणूक आयोगाने घातलेली तात्पुरती बंदी. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचं न्यायालयापर्यंत गेलेलं राजीनामा नाट्य यासारख्या घडामोडी मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी आहेत. त्यातच याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला ढाल-तलवार हे तर ठाकरे गटाला धगधगती मशाल हे चिन्ह देण्यात आलेलं आहे.
नक्की वाचा >> दीड वर्षांपूर्वीच ठाकरे कुटुंबाला लागलेली शिंदेंच्या बंडाची चाहूल? आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा; म्हणाले, “आमच्या घरात…”
नितेश राणेंनी ठाकरे गटाच्या पक्ष चिन्हाला मशालीऐवजी आईस्क्रीमचा कोन म्हटल्याचा संदर्भ देत आमदार रविंद्र वायकर यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना वायकर यांनी, “ती मशाल नसून कोन आहे असं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी ते तोंडात घेऊन बघावं. तोंडात घेतल्यानंतर तो आईस्क्रीमचा कोन आहे की मशाल आहे हे चटके बसल्यानंतर कळू शकतं,” असा टोला नितेश राणेंना लगावला.
निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला सोमवारी ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले होते. याआधी शिंदे गटाने ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘गदा’ ही तीन पर्यायी चिन्हे आयोगाकडे सादर केली होती. ‘उगवता सूर्य’ हे चिन्ह खुल्या यादीत नव्हते, ‘त्रिशूळ’ आणि ‘गदा’ या चिन्हांना धार्मिक संदर्भ होता. शिवाय, ‘त्रिशूळ’ या चिन्हाचा पर्याय ठाकरे गटानेही दिला होता. त्यामुळे शिंदे गटाने दिलेले तीनही पर्याय आयोगाने फेटाळले आणि मंगळवारी नवे तीन पर्याय देण्यास सांगितले होते. त्यानुसार, दिलेल्या चिन्हांमधून आयोगाने शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्हाचे वाटप केले आहे. आयोगाने ठाकरे गटाला ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ व शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या नव्या पक्षनावांचे वाटप केले आहे.