मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात आठ नगरसेवक आपले नशीब आजमावणार आहेत. २०१७ च्या कार्यकाळातील आठ नगरसेवक आणि त्याआधीच्या कार्यकाळातील पाच नगरसेवक यंदा निवडणुकीत उभे राहणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील ३६ मतदारसंघांसाठी आतापर्यंत सर्व राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ च्या कार्यकाळातील आठ नगरसेवक निवडणूकीसाठी उभे राहणार आहेत. आधीच्या कार्यकाळातील मिळून डझनभर माजी नगरसेवक निवडणुकीत आपले नशीब आजमावणार आहेत.

हेही वाचा…औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया स्थगित, महाविद्यालये, विद्यार्थी पालक अडचणीत

शिवसेना ठाकरे गटाचे सर्वाधिक माजी नगरसेवक असून त्यात श्रद्धा जाधव (वडाळा), अनंत नर (जोगेश्वरी पूर्व), प्रवीणा मोरजकर (कुर्ला), मनोज जामसुतकर (भायखळा), समीर देसाई (गोरेगाव), उदेश पाटेकर (मागाठाणे) यांचा समावेश आहे. तर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी वर्सोवामधून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार)च्या राखी जाधव (घाटकोपर पूर्व), महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे (वरळी), स्नेहल जाधव (वडाळा), भाजपचे विनोद शेलार ( मालाड पश्चिम), कॉंग्रेसमधून आसिफ झकेरिया (वांद्रे पश्चिम), शिवसेना (शिंदे) मुरजी पटेल ( अंधेरी पूर्व), सुवर्णा करंजे (विक्रोळी) या नगरसेवकांचा समावेश आहे.

हेही वाचा…परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

गेल्या विधानसभा निवडणूकीत २०१९ मध्ये चार नगरसेवक आमदार बनले होते. त्यामध्ये यामिनी जाधव (भायखळा), दिलीप लांडे (चांदिवली), रमेश कोरगावकर (भांडूप), पराग शाह (घाटकोपर पूर्व) यांचा समावेश होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidhan sabha election 2024 more than twelve mumbai corporation corporator contesting assembly election mumbai print news sud 02