बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनला पाठदुखीच्या तक्रारीनंतर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विद्याचा १ जानेवारीला वाढदिवस आहे. वाढदिवस आणि नववर्ष स्वागताच्या सेलिब्रेशनसाठी विद्या आणि तिचा पती सिद्धार्थ रॉय अबू धाबीहून ते सेलिब्रेशनसाठी जात असलेल्या ठिकाणी रवाना झाले होते. मात्र, प्रवासात विद्याला पाठदुखीचा त्रास सुरू झाल्याने विमान मुंबईत उतरविण्यात आले.
विद्याला प्रचंड त्रास होत होता आणि त्यामुळे डॉक्टरांना विमानातच बोलवण्यात आले. यानंतर विद्याला विमानतळावरील क्लिनिकमध्ये तपासणीसाठी नेण्यात आले. विद्याला अचानक ताप आला, यासाठी तिला औषधही देण्यात आली. यानंतर तातडीने तिला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे केलेल्या चाचणीमध्ये विद्याला किडनी स्टोनची शक्यता असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती विद्याच्या प्रवक्त्याने दिली आहे.
अभिनेत्री विद्या बालन रुग्णालयात दाखल
वाढदिवस आणि नववर्ष स्वागताच्या सेलिब्रेशनसाठी विद्या आणि तिचा पती सिद्धार्थ रॉय अबू धाबीहून निघाले होते.
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड
Updated:
First published on: 31-12-2015 at 09:40 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidya balan hospitalised for suspected kidney stones cancels new year plans